शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नऊ दिवसात पाच हजार कुटुंबीयांशी ‘संवाद’!

By admin | Updated: August 31, 2016 02:19 IST

‘भेटी-गाठी स्वच्छतेसाठी’ उपक्रम; अधिकारी-पदाधिकारी ग्रामस्थांच्या दारी.

वाशिम, दि. ३0 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'भेटी-गाठी स्वच्छतेसाठी' या उपक्रमाच्या नवव्या दिवसांपर्यंत वाशिम जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या तब्बल पाच हजार कुटुंबीयांशी अधिकारी व पदाधिकार्‍यांनी संवाद साधला. राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख गृहभेटी, हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या ३५ हजार कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्त्व पटवून देण्याचे उद्दिष्ट वाशिम जिल्हा परिषदेने निश्‍चित केले. २२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. २२ ते ३0 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील तब्बल पाच हजार कुटुंबीयांशी संवाद साधून शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अधिकारी व पदाधिकार्‍यांनी गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या कुटुंबीयांकडे शौचालय बांधकामाचा आग्रह धरला. सोनखास, बिटोडा भोयर, जांभरून परांडे आदी गावातील नागरिकांनी गाव हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प केला असून, पदाधिकारी व अधिकार्‍यांनी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.वाशिम जिल्ह्यात ३५ हजार कुटुंबाच्या भेटीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, स्वच्छता कक्षाचे कर्मचारी, ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेचे पदाधिकारी जोमाने कामाला लागले असल्याचे दिसून येते. यावर्षी जिल्ह्यात ३५ हजार ८६५ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. शौचालय बांधकाम मोहिमेत दिरंगाई करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकार के.एम. अहमद यांनी दिले आहेत. शौचालय बांधकाम झाल्यानंतर तातडीने १२ हजार रुपयांचे अनुदान संबंधित लाभार्थींस वितरित करण्याचे निर्देशही दिले आहेत.