शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामात दिरंगाई; १00 ग्रामसेवकांवर कारवाई

By admin | Updated: December 24, 2015 02:47 IST

लेखा परिक्षण अहवालात २९६ कामांवर आक्षेप; प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल.

वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २0१४-१५ या वर्षात करण्यात आलेल्या तब्बल २९६ कामांवर लेखा परिक्षण अहवालाने आक्षेप नोंदविले. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्य अधिकार्‍यांनी बुधवारी, जवळपास १00 ते १0५ ग्रामसेवकांवर एक हजार रुपये दंड वसुलीची कारवाई केली. सहा पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी (पंचायत), सहायक लेखा अधिकारी व सहायक कार्यक्रम अधिकार्‍यांवरही हलगर्जीपणाचा ठपका ठेवून एक हजार रुपये दंड वसुलीची कारवाई केल्याने जिल्हा परिषद वतरुळात एकच खळबळ उडाली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता तसेच दिरंगाई झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. सनदी लेखापालांचे सन २0१४-१५ च्या लेखा परिक्षण अहवालातही २९६ कामांवर ठपका ठेवण्यात आला. यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील सर्वाधिक १२७ कामांचा समावेश आहे. त्याखालोखाल रिसोड तालुका ६४, मानोरा तालुका ४७, मालेगाव ४१, वाशिम १0 आणि कारंजा तालुक्यातील सात कामांचा समावेश आहे. या आक्षेपांचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांना प्राप्त झाल्यानंतर, ग्रामपंचायतनिहाय अनुपालन अहवाल तीन प्रतीत सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकार्‍यांना दिले होते. याउपरही लेखा आक्षेपाचे अनुपालन सादर झाले नाही. ग्रामपंचायतींना कॅश पेमेंट न करण्याच्या सूचना सर्व गट विकास अधिकार्‍यांना केल्या होत्या; मात्र या सुचनांकडे दुर्लक्ष करून ग्राम पंचायतींनी कॅश पेमेंट केल्याचे लेखा परिक्षण आक्षेपातून समोर आले.