शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
3
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
4
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
5
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
6
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
7
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
8
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
9
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
10
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
11
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
12
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
13
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
14
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
15
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
16
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
17
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
18
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
19
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
20
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाची उत्सुकता शिगेला!

By admin | Updated: June 10, 2016 02:14 IST

वाशिम जिल्हा परिषद व पंचायत समिती; ३0 जूनला अडीच वर्षांंचा कार्यकाळ संपणार!

वाशिम: जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतींचा अडीच वर्षांंचा कालावधी येत्या ३0 जून रोजी संपणार असून, आरक्षण काय निघणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, आरक्षण सोडत निघण्यापूर्वीच राजकीय घडामोडींनी वेग घेतल्याने निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. डिसेंबर २0१३ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. सदर निवडणूक शिवसेना-भाजप पक्षाच्या युतीने संयुक्तरीत्या लढविली, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढविली. ऐन निवडणुकीच्या काळातच गटबाजी उफाळून आल्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसून, २00८ च्या तुलनेत २0१३ मध्ये राकाँची सदस्य संख्या निम्यावर आली. राष्ट्रवादी काँग्रेस आठ, तर काँग्रेसने तब्बल १७ जागा जिंकून जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून मान मिळविला. शिवसेनेला आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार व भारिप-बमसं तीन असे पक्षीय बलाबल राहिले. अध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा अडीच वर्षाचा कार्यकाळ येत्या ३0 जून रोजी संपत असल्याने आता अध्यक्ष पदाचे आरक्षण काय निघणार? याकडे सर्वांंचे लक्ष लागून आहे. दरम्यान, २0१४ मधील विधानसभा निवडणुकीने जिल्हा परिषद सदस्य संख्येतही उलथापालथ केली. जि.प. सदस्य विश्‍वनाथ सानप दाम्पत्य मनसेतून शिवसेनेत दाखल झाल्याने सेनेचे संख्याबळ १0 झाले, तर मालेगाव जिल्हा परिषद गट बाद झाल्याने मनसेचे संख्याबळ एकवर आले. २0१३ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद एससी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने फारशी चुरस निर्माण झाली नसल्याचे बोलले जात आहे. अडीच वर्षांंच्या कालावधीनंतर अध्यक्षपदाचे आरक्षण काय निघणार? याकडे सर्वांचेच लक्ष असून, खुल्या प्रवर्गाची सोडत निघाली, तर बर्‍याच उलथापालथी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. १0, १२ किंवा १३ जून रोजी अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत निघणार असल्याची चर्चा आहे.