शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बँकांसमोर गर्दी कायम; नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 11:58 IST

Crowds persist in front of banks: बॅंकांसमोर तुफान गर्दी होत असून त्यावर कसा घालणार आवर, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ५ एप्रिलपासून ‘ब्रेक दी चेन’ मोहीमेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याअंतर्गत एकाचठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत; मात्र बॅंकांसमोर तुफान गर्दी होत असून त्यावर कसा घालणार आवर, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ मोहीमेअंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आले. यादरम्यान रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(२)(३) अन्वये संचारबंदी लागू असेल. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच दर आठवड्याच्या सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमवाबंदी लागू राहणार असून या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित फिरता येणार नाही किंवा एकत्रित जमता येणार नाही. प्रत्येक शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणाशिवाय परवानगी शिवाय बाहेर फिरता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील बॅंका पुर्वीप्रमाणेच सुरू असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे. अनेकजण तोंडाला मास्क  न लावता  फिजीकल डिस्टन्सिंगचा नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकारावर प्रशासन कसे नियंत्रण मिळविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी वाशिम, रिसोड, कारंजा, मानोरा, मालेगाव, शिरपूर यासह इतरही ठिकाणी असलेल्या बॅंकांमध्ये व बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. 

टॅग्स :washimवाशिमbankबँक