शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases : वाशिम जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ११टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 12:01 IST

Corona Cases in Washim : २०८८ सक्रिय रुग्ण असून, खबरदारीचा उपाय म्हणून खासगी कोविड रुग्णालयांची संख्या वाढविण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा 'स्फोट' होत असून, सक्रिय रुग्णांची संख्या ११ टक्क्यांवर पोहचली आहे. २०८८ सक्रिय रुग्ण असून, खबरदारीचा उपाय म्हणून खासगी कोविड रुग्णालयांची संख्या वाढविण्यात आली आहे.देशात साधारणतः मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत  सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. सप्टेंबर महिन्यात २६०० रुग्णांची भर पडली होती. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख कमी होत गेला. जानेवारी महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आले. कोरोनाचा प्रवास परतीच्या मार्गावर असतानाच,  फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक झपाट्याने वाढ झाली. यामुळे यापूर्वी बंद केलेली सरकारी कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले. कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. दैनंदिन हजारावर चाचण्या होत असून सरासरी २४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची टक्केवारी वाढली आहे. यापूर्वी सक्रिय कोरोना रुग्णांची टक्केवारी ६ होती. हा आकडा आता ११ टक्क्यावर पोहचला आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ११ टक्के अर्थात दोन हजारावर रुग्ण सक्रिय असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर काम करीत आहे.  

 जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. रुग्ण खाटा कमी पडू नये म्हणून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीदेखील आता अधिक जबाबदारीने काळजी घ्यावी. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम