शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेच्या कामांवर तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: December 25, 2015 03:04 IST

जिल्हाभरातून तब्बल २६९ तक्रारी : यंत्रानेच उरकली कामे!

संतोष वानखडे /वाशिम : या ना त्या कारणावरून नेहमीच चर्चेत राहणारी रोजगार हमी योजना वाशिम जिल्हय़ात अनियमिततेमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडत आहे. अनियमितता पाठ सोडत नाही; तोच जिल्हाभरातून रोहयोच्या कामांबाबत तब्बल २७९ तक्रारी प्राप्त झाल्याने, रोजगार हमी योजना टीकेचे लक्ष्य बनली आहे. बेरोजगारी कमी करणे आणि विकासात्मक कामांना चालना देणे या दुहेरी उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अमलात आणली. बेरोजगारांना रोजगाराची हमी देणारी ह्यरोजगार हमी योजनाह्ण जिल्हय़ातील अनेक भागांत लाखो रुपयांच्या कमाईचे कुरण बनत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त होत आहेत. पांदण रस्ते, सिंचन विहिरी, पेव्हर ब्लॉक, शेततळे, जलसंधारणाची कामे, दुष्काळ निवारणार्थची कामे या रोजगार हमी योजनेतून केली जातात. जुलै २0१५ पासून पेव्हर ब्लॉकच्या कामांवर बंदी लादली आहे. जलसंधारण व सिंचन विहिरींच्या कामांना प्राधान्य देऊन अपूर्ण असलेली पांदण रस्त्यांची कामे पूर्ण करण्याला जिल्हा प्रशासनाने हिरवी झेंडी दिली; मात्र पांदण रस्ते, शेततळे, सिंचन विहीर यासह अन्य कामांचा दर्जा सुमार असल्याच्या तसेच कामांत नियमितता नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या मग्रारोहयो कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. २३ डिसेंबरपर्यंत जिल्हाभरातून तब्बल २६९ तक्रारी आल्या. यामध्ये सर्वाधिक ६३ तक्रारी मंगरुळपीर तालुक्यातील असून, त्याखालोखाल ६0 तक्रारी मानोरा तालुक्यातून आल्या आहेत. रिसोड तालुका ४४, वाशिम ४२, मालेगाव ३२ आणि कारंजा तालुक्यातून २८ तक्रारींचा समावेश आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा कार्यालयाने चौकशीचा फास आवळणे सुरू केले आहे.