गांधी जंयतीपासून ‘स्वच्छ भारत मिशन’

By Admin | Updated: October 2, 2014 01:24 IST2014-10-02T01:24:59+5:302014-10-02T01:24:59+5:30

वाशिम जिल्ह्यात गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर स्वच्छतेची शपथ.

'Clean India Mission' from Gandhi Jayanti | गांधी जंयतीपासून ‘स्वच्छ भारत मिशन’

गांधी जंयतीपासून ‘स्वच्छ भारत मिशन’

वाशिम : राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभेचे आयोजन केले आहे. सदर ग्रामसभेत व गांधी जयंती निमित्त होणार्‍या कार्यक्रमात गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर स्वच्छतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे (पं.स.) यांनी दिली.
केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले निर्मल भारत अभियान आता अधिक गतिमान करण्यासाठी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन २ ऑक्टोबर रोजी ह्यस्वच्छ भारत मिशनह्ण असे नामांतर करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणुन २५ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर २0१४ या दरम्यान राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी जयंती निमित्त होणार्‍या कार्यक्रमात जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तालुकास्तरावर गटविकास अधिकारी आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचार्‍यांना स्वच्छतेची शपथ देणार आहेत. तसेच या अभियानात निवडलेल्या सुमारे ४४ ग्रामपंचायतींमध्ये जिल्हा व तालुका स्तरावरील सल्लागार आणि समन्वयक ग्रामसभेत स्वच्छतेची शपथ देणार आहेत. या अभियानामध्ये प्रत्यक्ष गृहभेटींना २ ऑक्टोबरपासून सुरवात होणार आहे. नेमुन दिलेल्या गावात दररोज किमान पाच कुटुंबातील सदस्यांना भेटुन याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

Web Title: 'Clean India Mission' from Gandhi Jayanti