गोवर्धना येथे दोन गटात हाणामारी

By Admin | Updated: April 7, 2017 22:41 IST2017-04-07T22:41:31+5:302017-04-07T22:41:31+5:30

शिरपूरजैन (वाशिम) : रिसोड तालुक्यातील गोवर्धना येथे ६ एप्रिल रोजी सायंकाळी दोन गटात हाणामारी झाली. २० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Clashes in two groups at Govardhana | गोवर्धना येथे दोन गटात हाणामारी

गोवर्धना येथे दोन गटात हाणामारी

शिरपूरजैन (वाशिम) : रिसोड तालुक्यातील गोवर्धना येथे ६ एप्रिल रोजी सायंकाळी दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून परस्पर विरोधी तक्रारीवरुन २० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
शिरपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गोवर्धना येथे ६ एप्रिलच्या रात्री सदानंद वाघ यांनी गावात दारु विक्रीबंद करण्याचा ग्रामसभेचा ठराव पुर्वी घेतल्याच्या कारणास्तव कंझर गटाकडून त्यांना जबर मारहाण करण्यात आली असल्याची फिर्याद भैय्यासाहेब वाघ यांनी दिली तर कंझर गटाने विरुद्ध गटातील लोकांनी समाजातील महिलेचा विनयभंग केला व काही जणांना मारहाण केल्याची फिर्याद पोलिसात दिली. शिरपूर पोलिसांनी दोन्ही गटातील २० जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. कंझर गटातील चार आरोपींना तर देशमुख (वाघ) गटातील आठ जणांना अटक करण्यात आली.

 

Web Title: Clashes in two groups at Govardhana