शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम संघातून स्त्री भ्रूण हत्येवर मंथन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:30 IST

ग्राम संघाच्या सभेतून सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा घडविणे आणि स्त्री भ्रूण हत्या टाळणे, अनिष्ट प्रथांवर हल्लाबोल, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर मंथन केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय ग्राम जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्राम संघाची स्थापना करण्यात येत आहे. ग्राम संघाच्या सभेतून सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा घडविणे आणि स्त्री भ्रूण हत्या टाळणे, अनिष्ट प्रथांवर हल्लाबोल, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर मंथन केले जात आहे.राष्ट्रीय ग्राम जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रत्येक गावामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्राम संघाच्या स्थापना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते. या निर्देशानुसार जिल्ह्यातील ग्रामसंघाची स्थापना केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक ग्रामसंघांची स्थापना झाली आहे. महिला व बालकल्याण अंतर्गत सेवा, योजना व सामाजिक प्रश्नाबाबत चर्चा घडवून महिलांच्या माध्यमातून काही अनिष्ट बाबीवर प्रतिबंध घालण्याबाबत जनजागृती केली जात आहे. सोमवारी पार्डी टकमोर येथे ग्रामसंघाची सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषेदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहूर्ले, बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, विस्तार अधिकारी बाळकृष्ण अवगण यांनी स्त्रीभ्रूण हत्या टाळणे, शिक्षण, आरोग्य ,महिला बचत गट तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत मुलीचे प्रमाणात होत असलेली घट इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी बचत गटाचे समन्वयक, अंगणवाडी सेविका व ग्रामसंघातील महिलांची उपस्थिती होती. संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिम