शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणात बदल; साथरोगाने जिल्हा फणफणला!

By admin | Updated: September 6, 2016 01:54 IST

सर्दी, ताप, खोकल्याने नागरिक त्रस्त, सरकारी व खासगी दवाखाने हाऊसफुल.

वाशिम, दि. ५ : वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप आदी साथरोगाने डोके वर काढले असून, उपचारार्थ शेकडो रुग्ण सरकारी व खासगी दवाखान्यात दाखल होत आहे. ढगाळ वातावरण आणि ऊन, सावलीच्या खेळात नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. गत एक महिन्यापासून वातावरणात प्रचंड बदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे, विषमज्वर आदी आजार नागरिकांना जडत असल्याचे दिसून येते. या विषाणूजन्य तापासोबत लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा जबर त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात साधारणत: दररोज ४५0 ते ५५0 नागरिक विविध आजारांच्या तपासणीसाठी येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खासगी दवाखान्यातही रुग्णांची गर्दी होत आहे. वातावरणातील बदल लहान बालक आणि वयोवृद्ध नागरिकांना शक्यतोवर सहन होत नाहीत. परिणामी, लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक आजाराला बळी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. लहान बालकांना सर्दी, ताप व खोकला या आजाराने ग्रासले असल्याचे रुग्ण संख्येवरून दिसून येते. सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात दररोज किमान १५0 ते १८0 बालकांना तपासणीसाठी आणले जात असल्याचे दिसून येते. ग्रामीण व शहरी भागातील खासगी रुग्णालयात ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, विषमज्वर अशा रुग्णांची कमालीची गर्दी होऊ लागली. त्यातच काही प्रमाणात हिवतापाचेही रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होऊ लागले.