प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मिळेना प्रमाणपत्र

By Admin | Updated: December 3, 2014 23:39 IST2014-12-03T23:39:47+5:302014-12-03T23:39:47+5:30

वारा जहाँगीर प्रकल्पांतर्गत प्रकार : अधिका-यांना निवेदन.

Certificate of Address for Project Affected Farmers | प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मिळेना प्रमाणपत्र

प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मिळेना प्रमाणपत्र

वाशिम : जवळपास चार वर्षाचा कालावधी व वारंवार मागणी करुनही वाशिम तालुक्यातील वारा जहाँगीर येथील शेतकर्‍यांना प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही.
यासंदर्भात वारा जहाँगीर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या शेतकर्‍यांनी लघू पाटबंधारे विभाग क्रमांक ३ च्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. त्यानुसार वारा जहाँगीर येथील लघू पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांनी ऑक्टोबर २0१0 मध्ये सरळ खरेदी खतान्वये शासनाला दिल्या. त्याला आज जवळपास चार वर्षाचा कालावधी लोटला आहे.
प्रकल्पासाठी जमीनी संपादित केल्याने जिल्हाधिकारी वाशिम यांच्या कार्यालयात धरणग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केला. यासंदर्भात अनेकदा लघू पाटबंधारे विभागाकडे पाठ पूरावा करण्यात आला. परंतू आजतागायत त्याबाबत पावले उचलली गेली नाही. संबंधीत माहिती मिळाल्याशिवाय धरणग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र मिळणे नाही त्यामुळे यासंदर्भात तातडीने पावले उचलून न्याय देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी केली आहे.
 

Web Title: Certificate of Address for Project Affected Farmers