शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 19:51 IST

वाशिम: आजही मुलामुलींमध्ये भेदभाव केला जात असून अनेकठिकाणी मुलींच्या जन्मानंतर तीला कचराकुंडी, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर टाकण्याचे प्रकार देखील उघडकीस येत आहेत. जर मुली जन्माला आल्या नाही तर आपल्याला बहिण, बायको, आई मिळणार नाही. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा, असे आवाहन श्रीश्री रविशंकर यांच्या शिष्य वैभवीश्रीजी यांनी येथे केले.  श्री हनुमान रामकथेचे तृतीय पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. 

ठळक मुद्देवैभवीश्रीजी यांचे प्रतिपादनस्त्रीभू्रण हत्या देशाला लागलेला कलंक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आजही मुलामुलींमध्ये भेदभाव केला जात असून अनेकठिकाणी मुलींच्या जन्मानंतर तीला कचराकुंडी, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर टाकण्याचे प्रकार देखील उघडकीस येत आहेत. जर मुली जन्माला आल्या नाही तर आपल्याला बहिण, बायको, आई मिळणार नाही. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा, असे आवाहन श्रीश्री रविशंकर यांच्या शिष्य वैभवीश्रीजी यांनी येथे केले.  श्री हनुमान रामकथेचे तृतीय पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. पुढे बोलताना आज अनेकजण कन्येची जन्मापुर्वीच गर्भात हत्या करतात. हा देशाला लागलेला मोठा कलंक आहे. मुलींना सुध्दा जन्माला येवू द्या, कारण भविष्यात ती लता मंगेशकर, सुनिता विल्यम, झाशीची राणी बनू शकते. मुलींनी सुध्दा श्रृंगार करताना संस्कृतीचे भान ठेवावे. ज्यामुळे वासना उत्पन्न होईल, असे वस्त्र परिधान करु नये. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केलेला श्रृंगार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणातून प्रकाशित झाला आहे. ज्यादिवशी या देशामध्ये खºयाअर्थाने मुलींना समान दर्जा देवून तीचा सन्मान केल्या जाईल त्यादिवशी निश्चितच दुष्काळ नष्ट होईल. प्रकृती आनंद व्यक्त करुन भरपूर पाण्याचा वर्षाव करील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. जेव्हा आपण कुणाला मदत करतो, तेव्हा तो प्रसाद बनतो. जिथे कथा होते, ते स्थळ तीर्थ बनते. चांगले कर्म आपल्याला आनंद मिळेल म्हणून करु नका, तर आनंदाने चांगले कर्म करा. कथेमुळे जीवनाची व्यथा नष्ट झाली पाहीजे. सद्गुरूची निवड करताना त्याची पुर्णपणे खात्री करुन घ्या, धर्मग्रंथात साधू व संतांचे लक्षण दिलेले आहे. भगवंताच्या कृपेने मिळालेले पद कुणीही घेवू शकत नाही. गुरुंच्या प्रती समर्पणाची श्रध्दा ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.