शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

बिएसएनएल सेवा आठ दिवसापासून बंद

By admin | Updated: July 24, 2014 23:07 IST

अनसिंग येथे गेल्या आठ दिवसांपासून सेवा बंद असल्यामुळे एकमेकापासून संपर्क तुटला असून बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

अनसिंग : येथे गेल्या दोन वर्षापासून बि.एस.एन.एल. च्या सेवेकडे या विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील सेवा नेहमीच विस्कळीत राहते. गत आठ दिवसांपासून सदर सेवा बंद असल्यामुळे येथील ग्राहकांना एकमेकापासून संपर्क तुटला असून बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
या ठिकाणी बि.एस.एन.एल. चे भव्य कार्यालय आहे परंतु त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांचा तुटवडा असून एकच कर्मचारी या ठिकाणचा कारभार पाहतो. या ठिकाणी ग्राहकांच्या संख्या हजारोंच्या वर आहे तसेच बँकेचे व्यवहार ऑनलाईन झाल्यामुळे सदर सेवा सुरळीत असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून या कार्यालयाकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील बॅटरीक पुर्णपणे खराब झाल्या आहेत. तसेच विद्युत पुरवठा खंडित झाला की त्यांची सेवा बंद पडते. त्यामुळे लोकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. येथील १६ जुलै प ासून सेवा पुर्ण पणे खंडीत असल्यामुळे लोकांचा संपर्क तुटला आहे. तसेच इंटरनेट बंद असल्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. या बाबत तक्रार करण्यासाठी येथील कार्यालयात कुणीही कर्मचारी वेळेवर सापडत नाहीत तसेच याबाबत वाशिम कार्यालयात अनसिंगचे सरपंच चिंतामण लांडगे, जगदीश राजे तथा ग्राहकांनी संपर्क केला असता येथील अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देवून ग्राहकांचे समाधान करण्याऐवजी त्यांना आमची सेवा बंद करुन टाका अशा भाषेत उत्तरे देत आहेत. त्यामुळे येथील ग्राहक त्रस्त झाले आहेत. सदर विस्कळीत सेवा नियमित न झाल्यास सर्व ग्राहक आपली सेवा बंद करणार असल्याचे सरपंच चिंतामण लांडगे, जगदीश राजे, किशोर सारडा, यांच्यासह इतर ग्राहकांनी इशारा दिला आहे.