शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांवरून भाजपा शिक्षक आघाडी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

वाशिम : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध प्रश्न प्रलंबित असून, याविरोधात भाजप शिक्षक आघाडी जिल्हा शाखा वाशिमने आक्रमक ...

वाशिम : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध प्रश्न प्रलंबित असून, याविरोधात भाजप शिक्षक आघाडी जिल्हा शाखा वाशिमने आक्रमक पवित्रा घेत ८ सप्टेंबर रोजी जि.प. शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाच्या तारखा तत्काळ घोषित करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तत्काळ सुरू करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम तत्काळ देय करावी, परिविक्षाधीन सहायक शिक्षक (शिक्षण सेवक) परिविक्षाधीन शिक्षकेतर कर्मचारी (शिक्षकेतर सेवक) यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढविण्यात यावे, शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, घोषित, अघोषित व मूल्यांकनास पात्र तुकड्या, शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची प्रत्यक्ष कार्यवाही करावी यासह विविध मागण्या प्रलंबित असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा शिक्षक आघाडीने बुधवारी आंदोलन केले.

०००००

... तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात व शिक्षक शिक्षकेतरांच्या मागण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, लवकरात लवकर मागण्या निकाली निघाल्या नाही तर यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश उगले यांनी दिला.