शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’च्या चाचणीसाठी तीन प्रयोगशाळांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:15 IST

दोन दिवसांत अहवाल प्राप्त होऊन रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होत आहे.

वाशिम: जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर वेळेतच उपचार व्हावेत म्हणून जिल्हा आरोग्य विभागाकडून संदीग्ध रुग्णांचे नमुने तीन प्रयोगशाळात पाठविले जात आहेत. अकोला, यवतमाळ आणि अमरावती येथील प्रयोगशाळेत जिल्ह्यातील संदीग्धांचे नमुने पाठविले जात आहेत. त्यामुळे दोन दिवसांत अहवाल प्राप्त होऊन रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होत आहे.अनलॉक-४ ची अमलबजावणी सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाधितांच्या संपर्कातील लोकांचे नमुने तपासणीचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या कोरोना संसर्ग काळात संदीग्ध रुग्णांची वेळेत तपासणी होऊन त्यांच्यावर उपचार न केल्यास स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पूर्वी जिल्ह्यातील बहुतांश संदीग्ध रुग्णांचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील संदीग्धांचे अहवाल वेळेत मिळण्यास विलंब लागत होता. आता केवळ वाशिमसह रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील संदीग्धांचे नमुने अकोला येथे पाठविले जात आहेत, तर कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील संदीग्धांचे नमुने अमरावतीच्या प्रयोगशाळेत, तर मानोरा तालुक्यातील संदीग्धांचे नमुने यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यामुळे अहवाल दोन दिवसांत मिळत आहेत.

दिवसाला १५० ते १६० नमुन्यांचे संकलनकोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. त्यात जिल्ह्यात एका दिवसांत सरासरी १५० ते १६० नमुने घेतले जातात. त्यामध्ये वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यात मिळून जवळपास ७०, कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात मिळून ५० ते ६०, तर मानोऱ्यातून २५ ते ३० संदीग्धांच्या नमुन्यांचा समावेश असतो.

संदीग्ध व्यक्तींच्या कोरोनाविषयक चाचणीचे अहवाल लवकर प्राप्त व्हावे, यासाठी अकोल्यासह अमरावती आणि यवतमाळ येथील प्रयोगशाळेत नमुने पाठविले जात आहेत. त्यामुळे दोन दिवसांत अहवाल प्राप्त होत आहे.- डॉ. अंबादास सोनटक्के,जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या