शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा विराजमान..

By admin | Updated: September 6, 2016 02:02 IST

वाशिम जिल्ह्यात ६३९ ठिकाणी सार्वजनिक गणशोत्सव मंडळात श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली असून गणरायांचे जल्लोषात स्वागत झाले.

वाशिम, दि. ५ : गेल्या एका महिन्यापासून आस लागून राहिलेल्या गणरायाची प्रतीक्षा अखेर संपली असून, सोमवारी घरोघरी विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचे थाटात स्वागत करण्यात आले. वाशिम जिल्ह्यात ६३९ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. गत आठवड्यांपासूनच बाप्पाच्या तयारीची लगबग सुरू होती. रविवारी रिसोड, वाशिम, कारंजा, मालेगाव, मानोरा व मंगरुळपीर बाजारपेठेत गणेशमूर्तींंंची खरेदी करण्याबरोबरच पुजेचे साहित्य, फळांची खरेदी, मिठाईच्या खरेदीसाठी भाविकांची गर्दी होती. वाशिम येथील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत सायंकाळी तर गर्दीमुळे वाहतूकही खोळंबली होती. ग्रामीण व शहरी भागात उत्सवाच्या पूर्वसंध्येला मंडप व प्रतिष्ठापनेची सर्व तयारी पूर्ण झाली होती.सोमवारी सकाळपासूनच गणरायांची स्थापना करण्याची लगबग सुरू होती. वाशिम शहरातील नगर परिषद रोडस्थित असलेल्या बाजारपेठेतून गणेशभक्तांनी गणरायांच्या आकर्षक मूर्ती घेऊन वाजत-गाजत मिरवणूक काढली. यावर्षी मिरवणुकीत सैराट चित्रपटातील गाण्यांच्या संगीताची धूम असल्याचे दिसून आले. ह्यगणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.. यासह अन्य गाण्यांच्या धूनमध्ये गणेशभक्तांनी गणरायांची स्थापना केली. जिल्ह्यात एकूण ६३९ गणेश मंडळांपैकी शहरी भागात जवळपास ३८0 गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. वाशिम शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक शहरात गणरायाचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक पर्वणी असते. वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा शहर व ग्रामीण भागात गणेशभक्तांनी गणरायांचे जल्लोषात स्वागत केले. पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार, वाशिम शहर पोलीस स्टेशन ७१, ग्रामीण ५८, कारंजा शहर ५0, ग्रामीण ४८, मंगरुळपीर ५४, रिसोड ७0, मालेगाव ५१, मानोरा ६२, धनज ३३, आसेगाव ३६, जऊळका रेल्वे २८, अनसिंग ४९, शिरपूर जैन पोलीस स्टेशन अंतर्गत ४१ गणरायाची स्थापना करण्यात आली.सामाजिक उपक्रमावर राहणार भरगावात सामाजिक एकोपा कायम राहावा, तंटामुक्तीचे वारे वाहावे, यासाठी ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर राहणार आहे. जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याचा मानस जिल्ह्यातील गणेश मंडळ व गणेशभक्तांनी व्यक्त केला.