शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही या आणि वाचनासाठी मोफत पुस्तके घेऊन जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

वाशिम : सोशल मीडियावर अधिकाधिक वेळ घालविणाऱ्या युवकांना वाचनाकडे वळविण्यासाठी जउळका रेल्वे येथील सूरज अवचार या युवकाने ओपन ...

वाशिम : सोशल मीडियावर अधिकाधिक वेळ घालविणाऱ्या युवकांना वाचनाकडे वळविण्यासाठी जउळका रेल्वे येथील सूरज अवचार या युवकाने ओपन अभ्यासिका / ग्रंथालय सुरू केले आहे. या ठिकाणी मोफत पुस्तके वाचायला मिळणार असून, नागरिक त्यांच्याकडील पुस्तकेदेखील ग्रंथालयाला देऊ शकणार आहेत.

मोबाइलच्या जमान्यात वाचनसंस्कृती लोप पावत असल्याचे दिसून येते. युवकांमध्ये मोबाइलवेड असल्याने ते पुस्तक वाचनाकडे वळत नाहीत. सूरज अवचार याने युवकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न चालविला आहे. जउळका या ग्रामीण भागात हे ओपन अभ्यासिका / ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोक, विद्यार्थ्यांनी वाचावे आणि वाचन परंपरा चालू राहावी यासाठी ही अभ्यासिका / ग्रंथालय सुरू करण्यात आल्याचे सूरज सांगतो. या ठिकाणी एक कपाट ठेवले असून, त्यात विविध विषयांवरील पुस्तके आहेत. विद्यार्थी कधीही मोफत पुस्तक घेऊन जाऊ शकतात, तसेच वाचून पुन्हा या ठिकाणी ते परत आणू शकतात, तसेच ज्यांच्याकडे विविध विषयांवरील पुस्तके आहेत, ते या अभ्यासिकेला पुस्तके भेटसुद्धा देऊ शकतात. ६ जून रोजी सुरू झालेल्या या अभ्यासिकेत ७० ते ८० पुस्तके ठेवण्यात आली होती. त्यातील ५० पुस्तके विद्यार्थी वाचण्यासाठी घेऊन गेले आहेत.

००००००

मोबाइल क्रमांकावर अभिप्राय

या ठिकाणी सूरजने एक मोबाइल क्रमांक दिला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुस्तकाचे नाव त्या नंबरवर पाठवायचे आहे, तसेच पुस्तक वाचल्यानंतर अभिप्रायसुद्धा या क्रमांकावर कळविता येणार आहे.

००००

तरुणांना नवीन विचार मिळेल

या उपक्रमाबद्दल सूरज अवचार म्हणातो, सध्या वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. ती पुन्हा एकदा सुरू व्हावी यासाठी ही अभ्यासिका / ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातून तरुणांना नक्कीच नवीन विचार मिळेल, असे सूरज अभिमानाने सांगतो.