धान्य वाटपाचे परिमाण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST2021-09-04T04:49:40+5:302021-09-04T04:49:40+5:30

............... बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप वाशिम : राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेचे ...

Announce the extent of grain distribution | धान्य वाटपाचे परिमाण जाहीर

धान्य वाटपाचे परिमाण जाहीर

...............

बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप

वाशिम : राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय काम वाटप समितीमार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बरोजगारांच्या सेवा सोसायटींना कंत्राटी तत्त्वावर काम वाटप केले जाणार आहे, असे कळविण्यात आले.

................

उड्डाणपुलानजीक वाहतूक ठप्प

वाशिम : शहरातून पुसदकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वेगेटनजीक ३ सप्टेंबर रोजी सकाळी तब्बल एक तास वाहतूक जागीच ठप्प झाली होती. वाहनांच्या गर्दीत रुग्णवाहिकाही फसल्याचे यावेळी दिसून आले.

...................

वाशिम शहरात धुवाधार पाऊस

वाशिम : शहरात ३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास धुवाधार पाऊस कोसळला. प्रदीर्घ दडीनंतर पावसाचे आगमन झाल्याने वातावरणातही काहीअंशी गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Announce the extent of grain distribution