जुगार खेळणा-या पाच जणांवर कारवाई

By Admin | Updated: September 21, 2015 01:56 IST2015-09-21T00:06:00+5:302015-09-21T01:56:09+5:30

खामगाव जिन परिसरात वाशिम पोलीसांची कारवाई.

Action on five of the gamblers | जुगार खेळणा-या पाच जणांवर कारवाई

जुगार खेळणा-या पाच जणांवर कारवाई

वाशिम : येथील खामगाव जिन परिसरात २0 सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.३0 वाजताच्या दरम्यान जुगारावर छापा टाकून ५ जणांवर कारवाई केल्याची घटना घडली. खामगाव जीन परिसरात काही इसम पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच तात्काळ डी.बी. पथकाने त्या ठिकाणी रेड करुन महादू प्रल्हाद त्रिभूवन, कैलास श्रीराम जोगदंड, विनोद रामभाउ वाघमारे, साहेबराव किसन साबळे, आकाश गोविंदा रनशिंगे यांना एक्का बादशाह नावाच्या जुगाराववर पत्ते खेळताना मिळून आले. त्यांचेकडून १५0५ रुपये व ५२ ताशपत्ते जप्त करण्यात आल्यावरुन त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांचेविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली उदय सोयस्कर, अष्टोनकर, श्रीराम मिश्रा, राजेश बायस्कर, गुडधे, नरवाडे, भोंबे, अरदवाड, गिर्‍हे यांनी केली.

Web Title: Action on five of the gamblers