शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीतील आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:26 IST

मागास प्रवर्गातील ३३ टक्के कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण दिले जात होते; परंतु राज्य शासनाने ७ मे २०२१ रोजी शासन निर्णय ...

मागास प्रवर्गातील ३३ टक्के कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण दिले जात होते; परंतु राज्य शासनाने ७ मे २०२१ रोजी शासन निर्णय पारित करीत पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण संपुष्टात आणले आहे. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांच्या राखीव कोट्यातील सर्व रिक्त जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे शासनाचे निर्देश असून, या निर्णयानुसार कार्यवाही करण्याचा सपाटा सुरू आहे. याविरोधात लढा देण्यासाठी व ७ मे रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याकरिता मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी संघटना यांनी एकत्र येऊन राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समिती गठित केली. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून २६ जून रोजी आरक्षण हक्क कृती समिती व विविध सामाजिक संघटना, कर्मचारी संघटनांतर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. आरक्षणविरोधी शासनाचा धिक्कार असो, मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा, यासह विविध घोषणा देण्यात आल्या. पोलीस स्टेशन चौक, बसस्थानक, सिव्हिल लाइनमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धडकला. यावेळी शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे सादर केले. या मोर्चात राज्य आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य प्रतिनिधी मिलिंद उके, जिल्हा निमंत्रक विश्वनाथ महाजन, रिपाइं जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, हेमंत तायडे, विशाल डुकरे, राजेश भारती यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.