७५ हजारांचे सोने केले परत !

By Admin | Updated: October 29, 2016 02:30 IST2016-10-29T02:30:58+5:302016-10-29T02:30:58+5:30

मंगरुळपीा येथे युवकाने दिला माणुसकीचा परिचय.

75 thousand gold returned! | ७५ हजारांचे सोने केले परत !

७५ हजारांचे सोने केले परत !

मंगरुळपीर, दि. २८- बसच्या प्रवासादरम्यान ७५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्याची सापडलेली पिशवी एका प्रवाशाने परत करून माणुसकीचा परिचय दिला. हा प्रकार २८ ऑक्टोबर रोजी अनसिंग ते मंगरुळपीर या बसमध्ये घडला.
शुक्रवारी ११ वाजता एम.एच 0७ सी - ९४८६ क्रमांकाच्या अनसिंग ते मंगरूळपीर या बसमध्ये एका प्रवाशाची जवळपास ७५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्याची पिशवी आढळून आली. सदर पिशवी निदर्शनात पडताच, एका प्रवाशाने आगराचे वाहक विकास डुबुले यांना दिली. डुबुले यांनी सदर सोने बस आगारात सहायक वाहतूक निरीक्षक सुरेश सोनोने यांच्याकडे जमा केले आहे.

Web Title: 75 thousand gold returned!