शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ जयंतीनिमित्त ६०० किमी ‘सायकलवारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 16:27 IST

Washim News वाशिम-पांढुर्णा (मध्यप्रदेश) असे ६०० किमीचे अंतर सायकलने कापून यापूर्वीचे विक्रम मोडीत काढले.

वाशिम - गत चार वर्षांपासून सायकलव्दारे पर्यावरण जनजागृती करणाºया वाशिम सायकलस्वार ग्रूप व वाशिम रॉदीनर ग्रूपचे सदस्य तसेच सायकलस्वारांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ९ ते १२ जानेवारी या दरम्यान वाशिम-पांढुर्णा (मध्यप्रदेश) असे ६०० किमीचे अंतर सायकलने कापून यापूर्वीचे विक्रम मोडीत काढले.वाशिम सायकलस्वार ग्रूप व वाशिम रॉदीनर ग्रूप, सायकलस्वार हे सायकलवारीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, आरोग्याचा संदेश देत आहे. ९ ते १२ जानेवारी या दरम्यान आयोजित सायकल ब्रेवेट स्पर्धेच्या माध्यमातून २० सायकलस्वारांनी वाशिम-पांढुर्णा (मध्यप्रदेश) असे ६०० किमीचे अंतर कापले. यापैकी १४ सायकलस्वारांनी ४० तासांचे निर्धारीत अंतर १ तासाआधीच पूर्ण केले. या स्पर्धेचा प्रारंभ ९ जानेवारी रोजी स्थानिक पाटणी चौक येथून पहाटे ४ वाजता करण्यात आला. या स्पर्धेत २० जणांनी सहभाग घेतला होता. मंगरुळपीर, कारंजा, अमरावती, मोर्शी, वरुड, पांढुर्णा (मध्यप्रदेश) सावनेर व परत वाशिम अशी ही सायकलवारी होती. मोहीम समाप्तीनंतर वाशिम येथे आदेश कहाते, दिपक एकाडे, नगरसेवक राहुल तुपसांडे, अ‍ॅड. नंदकिशोर पाटील, डॉ. भरत सातपुते यांच्यासह मान्यवरांनी सायकलस्वारांचे स्वागत केले. या स्पर्धेत सहभागी ९ युवक सुपर रांदीनियर पदकाचे मानकरी ठरले. पुढील १०० कि.मी. ची ब्रेवेट पॉप्युलर स्पर्धा १७ जानेवारी रोजी वाशिम येथे होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले. गेल्या ५ वर्षापासून चेतन शर्मा हे वाशिम रांदीनियर ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबवित आहेत.

टॅग्स :washimवाशिमJijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तव