शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ातील ५0 वीज चोरांकडून पाच लाख रुपये दंड वसूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:52 IST

गत आठवड्यापासून महावितरणने वीज चोरट्यांविरुद्ध धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून, ७ सप्टेंबर रोजी वीज चोरी करताना आढळून आलेल्या ५0 ग्राहकांकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे; तर १४ सप्टेंबर रोजी आणखी ४0 वीज चोरांना पकडण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता पी.के.चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देकारवाईचा धडाका सुरूच४0 जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गत आठवड्यापासून महावितरणने वीज चोरट्यांविरुद्ध धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून, ७ सप्टेंबर रोजी वीज चोरी करताना आढळून आलेल्या ५0 ग्राहकांकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे; तर १४ सप्टेंबर रोजी आणखी ४0 वीज चोरांना पकडण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता पी.के.चव्हाण यांनी दिली.जिल्हय़ातील शहरांसह ग्रामीण भागातील विद्युत फिडरवरील वीज चोरीचे प्रमाण वाढले असून, त्याचा थेट परिणाम नियमित वीज देयक अदा करणार्‍या ग्राहकांवर होत आहे. याशिवाय महावितरणचेही महिन्याकाठी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन गत आठवड्यापासून महावितरणने विशेष पथक तयार करून शंकास्पद ग्राहकांचे मीटर तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून गत आठवड्यात जिल्हय़ातील ५0 ग्राहक वीज चोरी करताना आढळून आले. त्यांच्याकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.  तसेच १४ सप्टेंबरला पुन्हा जिल्हय़ात कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान वाशिम तालुक्यात ९, मालेगाव १0, रिसोड ६, मंगरूळपीर ७ आणि कारंजा लाड तालुक्यातील ८ वीज चोरांना पकडण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी दिली.-