५० वीज चोरांकडून ५ लाख रुपये दंड वसूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:56 IST2017-09-14T19:56:05+5:302017-09-14T19:56:14+5:30

गत आठवड्यापासून महावितरणने वीज चोरट्यांविरूद्ध धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून ७ सप्टेंबर रोजी विजचोरी करताना आढळून आलेल्या ५० ग्राहकांकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे; तर १४ सप्टेंबर रोजी आणखी ४० विजचोरांना पकडण्यात आले असून त्यांच्याविरूद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता पी.के.चव्हाण यांनी दिली.

50 electric thieves get 5 lakh rupees fine! | ५० वीज चोरांकडून ५ लाख रुपये दंड वसूल!

५० वीज चोरांकडून ५ लाख रुपये दंड वसूल!

ठळक मुद्देकारवाईचा धडाका सुरूच४० जणांविरूद्ध कारवाई प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गत आठवड्यापासून महावितरणने वीज चोरट्यांविरूद्ध धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून ७ सप्टेंबर रोजी विजचोरी करताना आढळून आलेल्या ५० ग्राहकांकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे; तर १४ सप्टेंबर रोजी आणखी ४० विजचोरांना पकडण्यात आले असून त्यांच्याविरूद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता पी.के.चव्हाण यांनी दिली.
शहरांसह ग्रामीण भागातील विद्यूत फिडरवरील विजचोरीचे प्रमाण वाढले असून त्याचा थेट परिणाम नियमित विज देयक अदा करणाºया ग्राहकांवरही होत आहे. याशिवाय महावितरणचेही महिन्याकाठी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेवून गत आठवड्यापासून महावितरणने विशेष पथक तयार केले असून शंकास्पद ग्राहकांचे मीटर तपासले जात आहे. यामाध्यमातून गत आठवड्यात जिल्ह्यातील ५० ग्राहक विजचोरी करताना आढळून आले. त्यांच्याकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच १४ सप्टेंबरला पुन्हा वाशिम तालुक्यात ९, मालेगाव १०, रिसोड ६, मंगरूळपीर ७ आणि कारंजा लाड तालुक्यातील ८ विजचोरांना पकडण्यात आले असून त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. 

Web Title: 50 electric thieves get 5 lakh rupees fine!