शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३३ प्रकल्प काठोकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:15 IST

जिल्ह्यात लघु पाटबंधारेअंतर्गत १३७ प्रकल्प आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांवर शेतकऱ्यांचे सिंचन अवलंबून आहे. यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या सुरुवातीपर्यंतही अपेक्षित पाऊस ...

जिल्ह्यात लघु पाटबंधारेअंतर्गत १३७ प्रकल्प आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांवर शेतकऱ्यांचे सिंचन अवलंबून आहे. यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या सुरुवातीपर्यंतही अपेक्षित पाऊस न पडल्याने प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली होती. तथापि, १० जुलैपासून पावसाने जिल्ह्यात धडाकाच सुरू केला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. परंतु, या पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीला मात्र मोठा आधार मिळाला असून, जिल्ह्यातील ३३ लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामुळे संबंधित प्रकल्पाच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

--------------

तीन मध्यम प्रकल्पात ६८ टक्के साठा

जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्प आहेत. यात वाशिम तालुक्यातील एकबुर्जी, कारंजा तालुक्यातील अडाण आणि मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पाचा समावेश आहे. या तिन्ही प्रकल्पांत मिळून सरासरी ६७.६० टक्के साठा झाला आहे. त्यात एकबुर्जी प्रकल्पात ९२.८२ टक्के, सोनल प्रकल्पात ६५.३१ टक्के, तर अडाण प्रकल्पात ६३.६९ टक्के साठा आहे.

------------------

मानोऱ्यातील १३ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

जिल्ह्यातील ३३ लघुप्रकल्प १०० टक्के भरले असून, त्यात मानोरा तालुक्यातील १३ प्रकल्पांचा समावेश आहे. मानोरा तालुक्यातील इतर प्रकल्पांची स्थिती चांगली असून, या तालुक्यातील एकूण २५ प्रकल्पांत मिळून ८६.५८ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याची सोय झाली आहे.

----------

१०० टक्के भरलेले प्रकल्प

तालुका - शंभर टक्के पातळीचे प्रकल्प

वाशिम - २

मालेगाव - ८

रिसोड - ३

मंगरुळपीर - ६

मानोरा - १३

कारंजा - १