शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२0५ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’

By admin | Updated: September 6, 2016 01:57 IST

वाशिम जिल्ह्यात २0५ गावांमध्ये ‘एक गाव,एक गणपती’चा उपक्रम साकारला.

वाशिम, दि. ५ : सोमवारी घरोघरी विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचे थाटात आगमन झाले असून, वाशिम जिल्ह्यात २0५ गावांमध्ये 'एक गाव,एक गणपती'चा उपक्रम प्रत्यक्षात साकारण्यात आला. सामाजिक एकोपा राखण्यासाठी आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनातर्फे गावकर्‍यांना 'एक गाव, एक गणपती' या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले जाते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन गावकर्‍यांना केले होते. प्रत्येक तालुक्यात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी बैठका घेऊन एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. गावकर्‍यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून गावकर्‍यांनी गावात या उपक्रमाबाबत एकमेकांशी हितगूज साधले. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या एकजूटीतून जिल्ह्यातील २0५ गावांत 'एक गाव-एक गणपती' हा उपक्रम साकारण्यात आला. २0५ गावांमध्ये केवळ एका गणरायाची स्थापना झाली असून, येथे सर्व गावकरी मिळून विविध उपक्रम राबविणार आहेत. सोमवारी सकाळपासूनच ग्रामीण भागात गणरायाची स्थापना करण्याची लगबग सुरू होती. शहरी भागातून गणेशभक्तांनी गणरायाच्या आकर्षक मूर्ती घेऊन गावात मोठय़ा उत्साहात गणरायाची वाजत-गाजत मिरवणूक काढली. विसर्जनापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.