शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
5
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
6
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
7
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
8
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
9
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
10
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
11
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
12
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
13
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
14
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
15
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
16
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
17
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
18
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
19
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
20
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
Daily Top 2Weekly Top 5

२00 जणांना अतिसाराची लागण

By admin | Updated: October 26, 2014 00:25 IST

तांदळी शेवई ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा.

वाशिम: यंदाच्या पावसाळ्यात विहिरीला नवीन पाणी आले; परंतु ग्रामपंचायत प्रशानाने विहिरीत ब्लिचिंग पावडरच टाकली नाही. तसेच आरोग्य विभागानेदेखील गावात कुठल्याही प्रकारचे आरोग्याच्या काळजीबाबत सुविधा पुरवल्या नसल्याने तांदळी शेवई येथील जवळ पास २00 जणांना अतिसाराची लागण झाली असून, त्यांच्यावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तांदळी शेवई येथील ग्रामपंचायत प्रशासन हे गावाच्या स्वच्छतेबाबत उदासीन आहे. गावा तील नाल्या गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी घाण पाणी तुंबले असून, रस्त्यावर येणार्‍या घाण पाण्यामुळे गावात डासाची उत्पत्ती वाढली आहे. तसेच ठिकठिकाणी कचर्‍याचे व घाणीचे ढिगारे साचले आहेत. स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत प्रशासन कुठल्याच ठोस उपाययोजना राबवत नाही. तसेच पार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तांदळी शेवई येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यरत असले तरी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कधीच हजर नसतात. वास्तविक पाहता उपकेंद्रातील अधिकार्‍यांनी गावात आरोग्याबाबत जनजागृती करायला पाहिजे. तसेच पाण्याचे नमुने घेऊन पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याचीदेखील चाचपणी करायला पाहिजे होती. तसेच गावात घरोघरी जाऊन ग्रामस्थांच्या रक्ताचे नमुने त पासणे तेवढेच गरजेचे आहे; परंतु आरोग्य विभागाच्या वतीने अशा कुठल्याही प्रकारच्या उ पाययोजना राबविण्यात आल्या नाहीत. तांदळी शेवई येथील एका भागातील तब्बल २00 ते २५0 जणांना अतिसाराची लागण झाली आहे. त्यामध्ये लहान बालकांचादेखील बर्‍यापैकी समावेश आहे. याबाबत पार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी सदर आजार हा दूषित पाण्यामुळे झाल्याचे सांगितले.*अधिकारी व सचिवावर कार्यवाहीची मागणी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने निष्काळजीपणा दाखवणार्‍या ग्रामपंचायत सचिव व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी जि. प. सदस्य विजया मानमोठे यांनी केली आहे.