शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

विटांचे दर कडाडणार की पडणार?

By admin | Updated: January 4, 2016 01:20 IST

विटा तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने विटांच्या किमती कडाडणार असल्याची शक्यता वर्तविली जात

तलवाडा : विटा तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने विटांच्या किमती कडाडणार असल्याची शक्यता वर्तविली जात असली तरी सद्य:स्थितीत बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट असल्याने या व्यवसायावरदेखील मंदीचे सावट येण्याची शक्यता वीट व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे. जर दर वाढले तर उत्पादकांना फायदा होईल, मात्र मंदी आली तर यामध्ये असलेल्या व्यावसायिकांना गेल्या दोन वर्षांपासून होत असलेला तोटा पुन्हा सहन करावा लागणार आहे़ विटांसाठी मुखत्वेकरून तुस, दगडी कोळसा, माती, भट्टीसाठी जागा, त्याकरिता लागणारा मजूरवर्ग आदींसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा पैसे मोजावे लागत असल्याने त्याचा परिणाम वीट उत्पादनावर होऊन विटांच्या किमतीही वाढणार आहेत़ त्यामुळे वीट उत्पादकांना जादा भावाने वीट विकावी लागणार आहे़ नाहीतर, तोटाच सहन करावा लागेल, असे त्यांनी लोकमतला सांगितले़ तर, सद्य:स्थितीत बांधकामे रखडल्याने विटांची मागणी मंदावलेली आहे़ तसेच तालुक्यात दरवर्षी वीटभट्टीमध्ये नवीन व्यावसायिक येत असल्याने भट्ट्यांचा आकडा हा वाढता असतो व उत्पादनही मोठ्या प्रमाणावर असते़ त्यामुळे सध्या मागणी कमी व उत्पादन जास्त, अशी परिस्थिती आहे़ विक्रमगड व परिसरात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो़ तालुक्यामध्ये दिवसेंदिवस या व्यवसायामध्ये तरुणवर्गाचे वाढते प्रमाण दिसण्यात येत असल्याने विक्रमगड हे पंचक्रोशीत वीटभट्ट्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध झाले आहे.़ विक्रमगड तालुक्यासह मुंबई व इतर शहरांत इमारतीच्या बांधकामांसाठी बहुतांशी विटा येथील भट्ट्यांमधून नेण्यात येतात़ माती आणि मुबलक पाणी यामुळे येथे हा व्यवसाय वाढला आहे़ त्यातच दगडी कोळसा व तुस, विक्रमगड तालुक्यातच उपलब्ध होऊ लागल्याने वीटभट्टी व्यवसाय या पंचक्रोशीमध्ये भरभराटीस आला आहे. परंतु, या वर्षी वीट तयार करण्यासाठी आवश्यक असणारी माती, दगडी कोळसा, गंधक यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच वीट तयार करण्याच्या मेहनतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याने त्याचा फटकाही या व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे वीट महागली आहे़