शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आले पाणी, कृषीमंत्री दादा भुसे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 07:43 IST

राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांना आताच्या घडीला ७०० रुपयांपासून ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. देशाच्या पातळीवर महाराष्ट्रात ७५ टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

पालघर : केंद्र सरकारने विदेश व्यापार कायदा १९९२ अंतर्गत कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याचे भाव एक हजार ५०० रुपयांनी गडगडले असून केंद्राचा हा निर्णय म्हणजे राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची खरमरीत प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी पालघर येथे ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांना आताच्या घडीला ७०० रुपयांपासून ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. देशाच्या पातळीवर महाराष्ट्रात ७५ टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. देशातून कांदा निर्यात होतो, त्यापैकी ८० टक्के कांदा हा राज्यातील शेतकरी बांधवांचा आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या मिळालेल्या उत्पन्नातून आता कुठे चांगले पैसे शेतकºयांच्या खिशात पडत असताना दुर्दैवानेकेंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घोषित केला.हा निर्णय घोषित केल्यानंतर कांद्याचे भाव एक हजार ते दीड हजार रुपयांनी गडगडले. हा निर्णय म्हणजे कांदा उत्पादक शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे कृषिमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी विनंती करण्यात आली आहे. येणाºया कालावधीत केंद्राला याचा विचार करावा लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट मत कृषिमंत्री यांनी या वेळी व्यक्त केले. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर कृषिमंत्री म्हणून आपली भूमिका काय असेल या उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर केंद्राने जर ऐकले नाहीतर शेतकºयांना आधी मिळणारा दर आणि निर्यातबंदीच्या घोषणेनंतर मिळणाºया दरात जो नुकसानीचा फरक असेल त्या फरकाचा मोबदला केंद्राने शेतकºयांना दिला पाहिजे, अशी माझी मागणी असल्याचेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला घेरण्यासाठी कोरोनाचे बळी लपवत असल्याचा आरोप झाल्यानंतर सुशांत राजपूत, रिया चक्रवर्ती आणि कंगना राणावत आदी प्रश्नांचे भाजपने रान उठवले. त्यातून विशेष काही हाती न लागल्याने कांद्याच्या निर्यातबंदीचा प्रश्न निर्माण करण्यात आला आहे का? या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देण्याचे कृषी मंत्र्यांनी टाळले.

टॅग्स :palgharपालघर