शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
5
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
6
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
7
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
8
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
9
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
10
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
11
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
12
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
13
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
14
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
15
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
19
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
20
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खाडीतील अतिक्रमणांविरोधात ग्रामस्थ झाले आक्रमक; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:35 IST

समुद्र किनाऱ्याला लागून उत्तन नाकापासून पालीपर्यंतची नवीखाडी व पात्र परिसरात दाट कांदळवन आहे.

मीरा रोड : भाईंदर उत्तन ते पाली दरम्यान समुद्राजवळच्या नवीखाडी तसेच कांदळवनात झालेला भराव, अतिक्रमण, कचरा - गाळ काढून भरतीचा प्रवाह मोकळा करा तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोनशेपेक्षा जास्त ग्रामस्थांनी सह्या करुन सोमवारी महापालिका आयुक्त, अपर तहसीलदार, स्थानिक नगरसेवकांनी निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

समुद्र किनाऱ्याला लागून उत्तन नाकापासून पालीपर्यंतची नवीखाडी व पात्र परिसरात दाट कांदळवन आहे. परंतु समुद्राकडील खाडीचे तोंड भरावामुळे बंद झाले आहे. त्यातच खाडीत भराव, बांधकामांमुळे भरतीचे पाणीही आतपर्यंत येत नाही. कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. खाडीत प्रक्रिया न करताच सांडपाणी राजरोस सोडले जाते. त्यामुळे खाडीत कचरा व गाळ साचून पाण्याचा प्रवाह व निचरा बंद झालेला आहे. खाडीत सांडपाणी साचून राहात असल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

उत्तन नाकापासून पालीपर्यंतच्या सरकारी जागेतील या नवीखाडी पात्रात अगदी महापालिकेसह भूमाफियांनी भराव करून बेकायदा गाळे, स्वच्छतागृह, बंगले आदी बांधकामे केली आहेत. अनेकांनी भराव करून जागा अडवून ठेवलेल्या आहेत. भराव व बांधकामे करताना येथील कांदळवनाच्या झाडांची कत्तल केली असून या प्रकरणी पूर्वी महसूल विभागाने काही जणांवर गुन्हे दाखल केले होते. पण अजून एकही बांधकाम तोडलेले नाही वा भराव काढला गेला नाही. नव्याने येथे भराव तसेच कांदळवनची झाडे सुकून मारण्यात आल्या प्रकरणीही ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र