शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वसईत कायदा - सुव्यवस्थेची बोंब

By admin | Updated: August 13, 2015 23:03 IST

वसई-विरार उपप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळली असून दररोज दरोडे, बलात्कार, हत्या, गोळीबार, महिलांची मंगळसूत्रे खेचणे अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे.

वसई : वसई-विरार उपप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळली असून दररोज दरोडे, बलात्कार, हत्या, गोळीबार, महिलांची मंगळसूत्रे खेचणे अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे. दिवसाढवळ्या मंगळसूत्र पळवण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने महिला भीतीच्या वातावरणात वावरत असतात. गेल्या ३ वर्षांत परिसरात अतिरिक्त पोलीस ठाणी स्थापन करण्यात आली, परंतु गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे काही सामाजिक संस्थांनी उपप्रदेशात सागरी आयुक्तालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. याप्रश्नी राज्य सरकार उदासीन दिसून येते.काही वर्षांत उपप्रदेशातील गुन्हेगारी चढत्या कमानीवर आरूढ झाली असून नागरिक भीतीच्या वातावरणात राहत आहेत. ज्वेलर्सवरील दरोडे, दररोज घडणाऱ्या बलात्काराच्या घटना, सदनिका फोडणे, अशी शेकडो प्रकरणे गेल्या १५ वर्षांत घडली. एकाही प्रकरणातील आरोपी शोधणे पोलिसांना शक्य झाले नाही. पूर्वी रात्रीच्या वेळी पोलिसांकडून कोम्बिंग आॅपरेशन होत असे. परंतु, हे आॅपरेशन आता बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपी शोधणे पोलिसांना दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्भय जनमंचने सागरी आयुक्तालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी राज्याच्या गृह खात्याकडे केली, पण गृह खात्याने त्यांच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले असून दरोडे टाकण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या चड्डी बनियान गँगने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. लवकरच या सर्व प्रकरणी नागरिकांचे एक शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. (प्रतिनिधी)