शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वसईत बेकायदा वाहतूक

By admin | Updated: October 11, 2016 02:33 IST

विरार आणि नालासोपारा शहरात आता बेकायदेशिरपणे सहा आसनी मॅजिक रिक्शांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. तर नवघर-हावे रस्त्यावर खाजगी

शशी करपे / वसईविरार आणि नालासोपारा शहरात आता बेकायदेशिरपणे सहा आसनी मॅजिक रिक्शांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. तर नवघर-हावे रस्त्यावर खाजगी बसमधून प्रवाशी वाहतूक जोरात सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे वाहतूकीचे सर्व नियम डावलून क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी वाहून नेण्याची हिंमत खाजगी वाहतूकदार दाखवत आहेत.नालासोपारा पूर्वेली तुळींज पोलीस स्टेशनलगत संध्याकाळी सहा नंतर सफे द रंगाच्या सहा आसनी मॅजिक रिक्शा प्रवाशी वाहतूक करीत आहेत. शंभरहून अधिक मॅजिक रिक्शा पोलिसांदेखत कायदेशिरपणे वाहतूक करीत असून क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी वाहून नेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.विरार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे कार्यालय आहे. त्यांच्या देखत पालिका हद्दीत परवानगी नसलेल सहा आसनी सफेद रिक्शा प्रवाशी वाहतूक करीत असताना कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.दरम्यान, वसई विरार परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा तयार करण्यात आली आहे. मात्र, वाहतूक पोलीस सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सात दरम्यान काही ठिकाणी पहावयास मिळतात. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशिर रिक्शा स्टँड आहेत. त्याठिकाणी मर्यादेपेक्षा जादा रिक्शा असल्याने वाहतूक कोंडी होत असले लोक त्रासलेले आहेत. त्यातच रिक्शा चालक किमान पाच प्रवाशी वाहून नेत असताना दिसतात. हा प्रकार रोखण्यासाठी तैनात असलेले पोलीस नाक्यावर कधीच दिसत नाहीत. रिक्शा स्टँडवरून गायब असलेले पोलीस आता नव रस्त्यांवर दुचाकी आणि खाजगी वाहतुकदारांची कागदपत्रे तपासण्यात गुंग असल्याचे पहावास मिळते. ज्या रस्त्यांवर दुचाकी आणि मालवाहतूक होते त रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची गर्दी दिसून येते. त्यांच दिमतीला बिट मार्शलही दिसू लागले आहेत. बिट मार्शलना सतत मोटार सायकलवरून फिरत राहून गस्त घालण्याचे काम आहे. मात्र, आता बिट मार्शलही दुचाकी वाहनांची तपासणी करू लागले आहेत. पोलिसांकडून दुचाकी वाहनधारकांना दिला जाणारा छळ चर्चेला विष बनला आहे.