शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिका : अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:23 IST

वसई विरार शहरातील वाढत्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण व कारवाई करण्यात अपयशी ठरलेली व पालिका आयुक्तांनी स्वत: स्थापन केलेली महानगरपालिकेची अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती गुरुवारी बरखास्त केल्याची माहिती पालिका आस्थापना विभागाचे प्रमुख रवी पाटील यांनी लोकमतला दिली आहे.

वसई  - वसई विरार शहरातील वाढत्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण व कारवाई करण्यात अपयशी ठरलेली व पालिका आयुक्तांनी स्वत: स्थापन केलेली महानगरपालिकेची अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती गुरुवारी बरखास्त केल्याची माहिती पालिका आस्थापना विभागाचे प्रमुख रवी पाटील यांनी लोकमतला दिली आहे.दरम्यान दोन वर्षांपूर्वीच दस्तुरखुद्द पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी स्वत:च्या अध्यक्षतेखाली पालिकेतील विविध विभाग व त्यांचे उपायुक्त, सहा.आयुक्त व इतर अधिकारी मिळून अशी एक महत्वाची समिती स्थापन केली होती, तिने प्रत्येक प्रभागातील अनधिकृत बांधकामावर अंकुश म्हणून अतिक्र मण विभाग व सहा. आयुक्तांच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेऊन बेकायदा बांधकाम धारकाला वेळीच नोटीस बजावणे, गुन्हे दाखल करणे अथवा न्यायालयीन कारवाई करणे तसेच प्रसंगी निष्कासनाची कारवाई करणे आदी जबाबदाऱ्या नेमून दिल्या होत्या, मात्र तरीही शहरात अवैध बांधकामे वाढत होती. या समितीतील काही निवडक सदस्यांवर गुन्हे ,भ्रष्ट कारभाराचे आरोप तर काहिंवर निलंबनाची कारवाई झाली,अखेर उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळे पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी पालिकेच्या एका बैठकीत ही समितीच बरखास्त करून यात तिच्याकडील जबाबदाºया या त्या -त्या प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांकडे देण्याबाबत गुरूवारी निर्णय घेतला.समिती अपयशी का ठरली याचा शोध घेऊन त्या त्रुटी व उणिवा दूर करण्याची व तिचे अस्तित्व टिकवून तिला प्रभावी करण्याची गरज असतांना तिला बरखास्त का केली असा प्रश्न चर्चिला जात आहे. परंतु त्याबाबत आयुक्तांनी कोणताही खुलासा केलेला नाही.प्रशासनात होती नाराजीआपले अधिकार काढून घेऊन ते या समितीकडे दिले गेलेत अशी भावना महापालिका प्रशासनातील अधिकाºयांची झाली होती. त्यामुळे त्यांची असलेली नाराजी भोवल्यामुळे ही समिती हेतूत: अपयशी ठरविली गेली असावी अशीही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या