शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar: मिलिंद मोरे मृत्यू प्रकरण: आरोपीेंना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 18:55 IST

Milind More Death Case: नवापूर येथील सेव्हन सी रिसॉर्टमध्ये ठाणे शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांच्या मृत्यूप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

- मंगेश कराळे नालासोपारा - नवापूर येथील सेव्हन सी रिसॉर्टमध्ये ठाणे शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांच्या मृत्यूप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधा ऐवजी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

ठाण्याचे माजी शहरप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र असलेले मिलिंद मोरे हे ठाण्याच्या शिवेसना (उध्दव ठाकरे) गटाचे माजी उपशहरप्रमुख होते. रविवारी ते आपल्या कुटुंबियांसह विरारच्या अर्नाळा-नवापूर येथील सेव्हन सी या रिसॉर्टमध्ये सहलीसाठी आले होते. मात्र त्यावेळी एका रिक्षाचालकाशी त्यांचा वाद झाला. यानंतर रिक्षाचालक गावातून आपल्या साथीदारांना घेऊन आला. १५ ते २० जणांनी मिलिंदे मोरे आणि त्यांच्या अन्य नातेवाईकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर काही वेळातच मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. या घटनेचे तीव्र पडसाद वसई आणि ठाण्यात उमटले होते. याप्रकरणी रात्री उशीरा अर्नाळा सागरी पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकासह १८ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. नंतर मात्र सोमवारी हत्येचे ३०२ हे कलम लावण्यात आले. 

या आरोपींना मंगळवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी मोठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाने आरोपींना ४ ऑगस्टपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणातील आरोपींची नावं पुढीलप्रमाणे आहेत. राहुल घुटूकडे (रिक्षाचालक), ज्ञानेश्वर मेहेर, सचिन मेहेर, मनिष मेहेर, दत्तात्रय मेहेर, रमेश मेहेर, हेमेश मेहेर, कुणाल मेहेर, नारायण मेेहेर, विनायक मेहेर,  साहिल तांडेल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारCourtन्यायालय