शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वसईत नारळ-निरा प्रकल्प

By admin | Updated: July 13, 2015 03:12 IST

डहाणूपर्यंतची किनारपट्टी उत्पादनासाठी उपयुक्त असल्यामुळे येथे नारळाची प्रचंड लागवड करून त्यातून निरा निर्मितीचा प्रकल्प लवकरच येथे साकार होणार आहे

वसई : डहाणूपर्यंतची किनारपट्टी उत्पादनासाठी उपयुक्त असल्यामुळे येथे नारळाची प्रचंड लागवड करून त्यातून निरा निर्मितीचा प्रकल्प लवकरच येथे साकार होणार आहे. त्यातून मोठा रोजगारही निर्माण होणार असल्याने त्यास केंद्राचे मोठे अनुदानही लाभणार आहे. नारळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय सहकारी सोसायट्या स्थापन करून त्यांच्या महासंघाद्वारे हा प्रकल्प साकारणार आहे.जगभरात नारळाच्या निरेला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन तया दृष्टने वसई विरार उपप्रदेशात काय करता येईल याची पाहणी करण्यासाठी माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस व माजी महापौर नारायण मानकर यांनी नुकताच केरळचा तीन दिवसांचा दौरा केला. विशेष म्हणजे या सहकारी प्रकल्पाला केंद्र सरकारचे अनुदानदेखील मिळणार आहे.वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरितपट्टा टिकून असून मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे आहेत. या झाडांपासून पूर्वी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असे. परंतु, कालांतराने शेतकऱ्यांनी या पारंपरिक व्यवसायाकडे पाठ फिरविली. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम झाला. सर्व शेतकऱ्यांनी पुन्हा प्रयत्न केल्यास तालुक्यात मोठ्या प्रमाणात नारळ लागवड शक्य असून रोजगारनिर्मिती शक्य होणार असल्याचे मानकर व घोन्साल्विस यांनी सांगितले.