शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वाढवणकर संतप्त; घोषणा अन् धक्काबुक्की, ग्रामस्थांचा रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:09 IST

बंदराचे सर्वेक्षण रोखले; महिला आक्रमक झाल्याने परिसरात तणाव...

डहाणू :  प्रस्तावित वाढवण बंदराला  भूमिपुत्रांचा प्रचंड विरोध आहे. असे असताना आयटीडी कंपनीने पोलिसी बळाचा वापर करीत ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ड्रिलिंगचा सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाढवण व परिसरातील स्थानिकांनी आक्रमक होत ‘सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है’ अशी घोषणाबाजी करत सर्व्हे रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याने पोलिस व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक तसेच बाचाबाचीचा प्रकार घडला. यावेळी आयटीडी कंपनीच्या एका अधिकाऱ्याला धक्काबुक्कीही करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून वाढवण बंदराच्या रस्त्यासाठी जमीन मोजणीबरोबरच इतर कामे सुरू आहेत. रस्ता मोजणीला ग्रामस्थांचा विरोध आहे. असे असतानाही सर्व्हे करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.

ग्रामस्थांचे रौद्ररूप पाहून कंपनीने गाड्या वळवल्याडायमेकर, शेतकरी, मच्छीमारांनी एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी तणाव निर्माण झाल्याने पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, सुप्रीम कोर्टाने वाढवण बंदराच्या स्थळावर ड्रिलिंग, बांधकाम आदी कामे करण्यास स्थगिती दिली असताना काम का सुरू केले जाते, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. समुद्रकिनारपट्टीवर ड्रिलिंगसाठी आणि बांधकामासाठी आयटीडी कंपनीने आणलेल्या काही गाड्या ग्रामस्थांचे रौद्ररूप पाहून पोलिसांनी मागे घेतल्या. दरम्यान, आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेडचे अधिकारी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह वरोर गावाच्या हद्दीत समुद्रात ड्रिलिंग सर्व्हे करण्यासाठी आले होते. 

ड्रिलिंग सर्व्हेला सशर्त मंजुरीदरम्यान, वाढवण बंदर संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष वैभव वझे, ज्योती मेहेर, विनीत पाटील, हेमंत तामोरे, रामकृष्ण तांडेल, नंदकुमार विंदे, निखिल पाटील, तसेच पोलिस अधीक्षक देशमुख यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान वाढवण बंदराच्या ड्रिलिंग सर्व्हेव्यतिरिक्त कोणतेही काम करू नये, अशी सशर्त मंजुरी देण्यात आली.

भरउन्हात बंदोबस्त; महिला पोलिस बेशुद्धवाढवण बंदराच्या ड्रिलिंग सर्व्हेसाठी आज सकाळपासून वरोर येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भरउन्हात बंदोबस्त सुरू असल्याने एक महिला पोलिस रेणुका राबड यांना चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Protest erupts at Wadhwan port site; villagers halt survey.

Web Summary : Villagers fiercely protested the Wadhwan port survey, clashing with police. Drilling was conditionally permitted after negotiations but tensions remain high, and a policewoman fainted due to the heat.
टॅग्स :Vasai Virarवसई विरारagitationआंदोलनPoliceपोलिस