शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

दोन कावड यात्रेकरूंचा नदीत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:51 IST

श्रावणी सोमवार निमित्ताने नालासोपारा ते तुंगारेश्वर मंदिर अशी कावड यात्रा काढली होती. त्यात नालासोपारा येथील सात ते आठ तरुणांचा गटही सामील झाला होता.

नालासोपारा : श्रावणी सोमवार निमित्ताने कावड यात्रेसाठी गेलेल्या दोन तरुणांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू झाला.  सचिन यादव (१८) व हिमांशू विश्वकर्मा (१८) अशी मृत तरुणांची नावे असून ते नालासोपारा येथील संतोषभवन परिसरात राहत होते.

श्रावणी सोमवार निमित्ताने नालासोपारा ते तुंगारेश्वर मंदिर अशी कावड यात्रा काढली होती. त्यात नालासोपारा येथील सात ते आठ तरुणांचा गटही सामील झाला होता. यात सचिन व हिमांशू यांचाही समावेश होता. याच प्रवासादरम्यान तुंगारेश्वर येथील नदीच्या ठिकाणी ते विश्रांतीसाठी थांबले होते. यावेळी सचिन यादव हा पाण्यात पाय धुण्यासाठी उतरला आणि पाय घसरून नदीत पडला. 

यावेळी हिमांशू विश्वकर्मा याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही  बुडाला. दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला तिसरा व्यक्तीही नदीत बुडत होता. मात्र, प्रसंगावधान राखून त्याला बाहेर काढले. या घटनेची माहिती पेल्हार पोलिसांना मिळताच अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना पेल्हार गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यापूर्वीचा त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  

तुंगारेश्वरला जाताना आंघोळीसाठी पाण्यात उतरू नका तसे आदेशही आम्ही काढलेत, पोलिस सतत याबाबत सूचना देत असतात. पण, असे हौशी लोक ऐकत नाहीत आणि दुर्घटना घडतात. दर्शनाला येताना नदीत आंघोळीसाठी उतरू नका. जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पेल्हार पोलिस ठाणे

अभयारण्यात बंदी  बुडण्याच्या घटना लक्षात घेता तुंगारेश्वर अभयारण्यात पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, श्रावण महिना सुरू असल्याने या येथील मंदिरात मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे ते या नदीत पाय धुणे, अंघोळ करण्यासाठी उतरतात.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेriverनदी