शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तलासरीत आदिवासींचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:31 IST

अच्छे दिनाचे गाजर दाखवीत सरकार अनेक प्रकल्प आणून या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत आहे, आदिवासी शेतकरी तसेच भूमिपुत्रांना उध्वस्त करून सरकार कोणाचा विकास करू पाहत आहे.

सुरेश काटे तलासरी : अच्छे दिनाचे गाजर दाखवीत सरकार अनेक प्रकल्प आणून या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत आहे, आदिवासी शेतकरी तसेच भूमिपुत्रांना उध्वस्त करून सरकार कोणाचा विकास करू पाहत आहे, विकासाच्या नावाखाली बड्या शेठ सावकाराच्या , भांडवलदारांच्या फायद्या साठी पर्यावरणाला उध्वस्त करणाºया प्रकल्पा विरोधात महाराष्ट्र गुजरात मधील जवळ पास २५ संघटनानी येथे विराट मेळावा घेऊन सरकारला इशारा दिला.९ आॅगस्ट या आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन तसेच आॅगस्ट क्र ांती दिनाच्या निमित्ताने तलासरीत हजारोच्या संख्येने आदिवासी विविध संघटनेच्या माध्यमातून एकत्र जमून भांडवलदारांच्या फायद्यासाठी पर्यावरण उध्वस्त करणाºया प्रकल्पांविरोधात एल्गार पुकारला.तलासरी जवळील वडवली निलिगरी हॉटेल जवळून महामार्गा वरून हजारोच्या संख्येने भूमिपुत्र मोर्चाने तलासरी बस डेपो येथे जमले नंतर सभा झाली, या वेळी विविध संघटनेच्या नेते व पदाधिकार्यांनी बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे, वाढवण बंदर , सागरी महामार्ग, समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग, विकास आराखडा, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, या सरकारच्या प्रकल्पाला कडाडून विरोध करण्यात आला,या जमलेल्या हजारो समुदायाला माकपा चे लहानु कोम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, माकप भूमीपुत्राच्या बाजूने असून अन्यायकारक प्रकल्पाला तो विरोध करेल, तसेच वाढवण बंदराचे नारायण पाटील यांनी वाढवण बंदरामुळे मच्छीमार व डायमेकिंगचा व्यवसाय धोक्यात येणार आहे, या बंदराला प्राधिकरणाने स्थगिती दिली असताना सरकार जबरदस्तीने प्रकल्प लादत असल्याचे सांगितले.तसेच एकता परिषदेचे विनोद दुमाडा, संतोष पावडे, डॉ सुनील पºहाड, गुजरात खेडूत समाजाचे सागर रबारी, अशोक चौधरी, रमाकांत पाटील, काळूराम धोदडे, ब्रायन लोबो, चंद्रशेखर प्रभू इत्यादीं सह अनेकांनी मार्गदर्शन केले मोठया संख्येने आदिवासी मोर्चेकरी महामार्गावरून चालू लागल्याने गुजरात बाजू कडील वाहतूक जवळपास तीन तास ठप्प झाल्याने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या अन्यायकारक प्रकल्प रद्द न केल्यास दिल्ली गाठून संसदेवर धडकण्याचा इशारा दिला. गरज भासल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णयही यावेळी घोषित करण्यात आला. अनेक संघटना सहभागीप्रकृती व समाज संवर्धन परिषद मध्ये चले जावं चा इशारा देण्यासाठी भूमिपुत्र बचाव आंदोलनाच्या झेंड्याखाली भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, खेडूत समाज, शेतकरी संघर्ष, वाढवण बंदर विरोधी कृती समतिी, मच्छीमार कृती समिती, कष्टकरी संघटना, सूर्या पाणी बचाव समिती, पर्यावरण संवर्धन समिती , पर्यावरण सुरक्षा समिती, आदिवासी किसन संघर्ष मोर्चा, युवा कोळी परिवर्तन ट्रस्ट, खेडूत हितरक्षक दल, श्रमीक संघटना, सगुना संघटना, युवा भारत तसेच अशा जवळ पास २५ संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.