शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या संथगतीमुळे वाहतूककोंडी, नागरिकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 02:01 IST

गेल्या चार वर्षांपासून नायगाव उड्डाणपूल रखडलेलाच आहे. हा पूल आज-उद्या सुरू होईल, या भरवशावर नागरिक पुलाच्या शुभारंभाची प्रतीक्षा करू लागले आहेत.

पारोळ : अतिमहत्त्वाचा असलेला नायगाव उड्डाणपूल रेल्वे प्रशासनाच्या संथ कारभारामुळे अधांतरी लटकला आहे. या उड्डाणपुलाच्या कामाच्या संथगतीमुळे परिसरात वाहतूककोंडी होत असल्याने हा पूल लवकर पूर्ण व्हावा, यासाठी नायगाव पूर्वेतील नागरिक वाट पाहत आहेत.नायगाव रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांची परवड होऊ लागली आहे. परिसरात उद्भवणारी रोजची वाहतूककोंडी यामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशातच जुचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपुलाचे काम ग्रामस्थांच्या विरोधामुळे बंद आहे.

येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०२१ साली नायगाव उड्डाणपूल सुरू झाल्यास बंद स्थितीत असलेल्या जुचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूककोंडी होण्याचा धोका संभवतो. अशा प्रसंगी भविष्यात वाहतूककोंडीचा नागरिकांना सामना करावा लागू नये म्हणून नायगाव पूर्व परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दोन्ही पूल तत्काळ सुरू करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. तसेच नायगाव उड्डाणपुलाचे सध्याचे कासवछाप काम पाहता पुलाचा शुभारंभ होता होता २०२२ साल उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नायगावचा हा उड्डाणपूल भविष्यात येथील वाहतूककोंडीवर प्रभावी पर्याय ठरणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून नायगाव उड्डाणपूल रखडलेलाच आहे. हा पूल आज-उद्या सुरू होईल, या भरवशावर नागरिक पुलाच्या शुभारंभाची प्रतीक्षा करू लागले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच येते आहे. या पुलाचे काम मार्गस्थ झाल्यास वसई ते मुंबई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होणार आहे. नायगाव पूर्व-पश्‍चिम जोडणाऱ्या या पुलाचे काम प्रशासनाकडून लवकर व्हावे, यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चे-आंदोलने केली. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही, असा आरोप स्थानिक करीत आहेत. दरम्यान, हा पूल पुढील वर्षी मे २०२१ अखेरीस वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूकदार आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुलाच्या कामाला रेल्वे प्रशासनाकडून सध्या परवानगी नसल्याने पुलाचे काम रखडले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार