शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिकेत भ्रष्टाचार झालेला नाही; आयुक्त गंगाथरन यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 02:58 IST

पालकमंत्री दादा भुसेंची आढावा बैठक संपन्न, याप्रसंगी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात विविध सूचना केल्या.

वसई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वसई-विरारची परिस्थिती चिंताजनक होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयाला भेट देत सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. या वेळी महानगरपालिकेत कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार झालेला नाही व तसे विधान मी केले नसल्याचा दावा आयुक्त गंगाथरन डी. यांनी केला.

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला खासदार राजेंद्र गावित, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तसेच वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आ. रवींद्र फाटक, आ. श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्याचा कोरोनासंदर्भातील आढावा देताना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकप्रतिनिधी व स्थानिक अधिकारी यांच्या समित्या स्थापन करून या परिस्थितीशी कशा प्रकारे लढा देता येईल व कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याची माहिती विशद केली. याउलट, वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे या विषयावर चर्चा न करता महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. हे मनमानी कामकाज चालवत आहेत, असा सूर होता. याप्रसंगी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात विविध सूचना केल्या. दरम्यान, या आढावा बैठकीत चर्चेदरम्यान खुलासा करताना महानगरपालिकेत कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार झालेला नाही व तसे विधान मी केले नसल्याचा दावा आयुक्त गंगाथरन यांनी केल्याने उपस्थित लोकप्रतिनिधी व पत्रकारांना धक्का बसला.ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयांत दाखल करून घ्याकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबई, ठाणे यासारख्या ठिकाणी जास्त खर्च करून उपचारासाठी दाखल होतात. मात्र, वसई तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही.रुग्णांना ६० कि.मी. दूर विक्रमगड, बोईसरला उपचारासाठी पाठविण्यात येत असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेण्याचे आदेश दिले तसेच काही विशेष सूचनादेखील आयुक्तांना समक्ष दिल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर