शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ठाकूर हटाव, बहू-बेटी की इज्जत बचाव

By admin | Updated: April 23, 2016 01:46 IST

आपल्या पुतणीचा विनयभंग करणाऱ्या सरपंच अनिल ठाकूर याच्यापासून गावातील मुली आणि स्त्रियांना धोका असल्यामुळे सरपंचाची हकालपट्टी करण्यात यावी

विरार : आपल्या पुतणीचा विनयभंग करणाऱ्या सरपंच अनिल ठाकूर याच्यापासून गावातील मुली आणि स्त्रियांना धोका असल्यामुळे सरपंचाची हकालपट्टी करण्यात यावी, असा ठराव सत्पाळा ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.सरपंच अनिल ठाकूरने होळीच्या दिवशी आपल्या पुतणीला नोकरीचे आमिष दाखवून एका हॉटेलवजा लॉजमध्ये नेले होते. तिथे गुंगीचे औषध देऊन त्याने तिचा विनयभंग केला. मात्र, वेळीच सावध होऊन आपला बचाव केल्यामुळे सदर तरुणीवरील अनर्थ टळला. या प्रकाराची माहिती तिने आपल्या पालकांना सांगितल्यावर अर्नाळा सागरी पोेलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. तिथून ही केस काशिमीरा पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर अनिल ठाकूरला अटक करण्यात येऊन त्याची जामिनावर त्याची मुक्तता करण्यात आली होती. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी ग्रामपंचायतीवर धरणे धरून अनिल ठाकूरची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडेही तशी लेखी मागणी करण्यात आली होती. तरीही, त्याच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. याचे पडसाद आजच्या महिला ग्रामसभेत उमटले. महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या या ग्रामसभेत ग्रामसेवक के.एच. नाईक यांनी माहिती दिली.त्यावर, या योजना तर ठीक आहेत. मात्र, सरपंचच आमच्या अब्रूवर उठला तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित महिलांनी या वेळी केला. पुतणीचा विनयभंग करून अनिल ठाकूर निर्ल्लजपणे ग्रामपंचायतीत येऊन बसतो. त्यामुळे दाखले घेण्यासाठी पंचायतीत यायला आम्हाला भीती वाटते. असे या सभेत महिलांनी नमूद केले. त्यानंतर, अनिल ठाकूरची हकालपट्टी करण्यात यावी, असा ठराव या वेळी एकमताने करण्यात आला. (प्रतिनिधी)