शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन भावांची आत्महत्या

By admin | Updated: April 5, 2016 01:09 IST

मोबाईलसाठी घरात केलेली चोरी उघडकीस येऊन पालक रागावतील या भितीपोटी नालासोपारा शहरातील दोन अल्पवयीन सख्या भावांनी धावत्या रेल्वेसमो

वसई : मोबाईलसाठी घरात केलेली चोरी उघडकीस येऊन पालक रागावतील या भितीपोटी नालासोपारा शहरातील दोन अल्पवयीन सख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उभे राहून एकत्रित आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रवीण कुंदन गुप्ता (१६) आणि अरुण कुंदन गुप्ता (१३) अशी त्यांची नावे असून शनिवारी रात्री उशिरा दोघांचे मृतदेह नालासोपारा रेल्वे स्टेशननजीक रुळावर आढळून आले. नालासोपारा पुर्वेकडील बाबूलपाडा येथील मटकेवाडी चाळीत कुंदन गुप्ता पत्नी आणि दोन मुलांसह रहात होते. विलेपार्ले येथे हमाली करणाऱ्या कुंदन गुप्ता यांनी आपली मुले गुरुवारपासून बेपत्ता झाल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात नोंदवली होती. शनिवारी रात्री दोन्ही मुले कुंदन गुप्ता यांना दोन्ही मुले नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरात अलकापुरी येथे भेटली होती. यावेळी त्यांनी दोघांनाही घरी घेऊन जाण्याचा प्रयत्नही केला होता. पण, प्रवीण आणि अरुण त्यांच्या हाताला हिसका देऊन पळून गेली होती. मुले रागावली असल्याने रात्री घरी परततील अशी धारणा झालेले कुंदन गुप्ता घरी निघून गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे ऐकून त्यांना मोठा धक्का बसला.मोबाईलचे वेड असलेल्या प्रवीण आणि अरुण यांनी वडिलांचे एटीएम कार्ड चोरून त्यातील सहा हजार रुपये काढून नवा मोबाईल फोन विकत घेतला होता. याप्रकरणी आईने जाब विचारला असता जुना विकून नवा घेतला अशी थाप त्यांनी मारली होती. पण, आईला मित्रांकडून खरी माहिती कळल्याचे समजताच दोघांनी गुुरुवारी घरातून पलायन केले होते. शुक्रवारी कुंदन गुप्ता यांनी तुळींज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. शनिवारी रात्री अलकापुरी येथे कुंदन गुप्ता यांना दोन्ही मुले भेटली होती. पण, वडिलांच्या हाताला हिसका देऊन दोघे गायब झाले होते. शुक्रवारी दोघांनी एटीएममधून ३४ हजार रुपये काढले होते. वडिल भेटल्यानंतर त्याच रात्री दोघांनी हातात हात घालून चर्चगेटकडे जाणाऱ्या धावत्या लोकलपुढे उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ मोबाईल आणि पैसे आढळून आले नाहीत. त्यामुळे दोघांनी ३४ हजार रुपये का काढले याचे गुढ वाढले आहे.