शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

तुनीषाच्या आयुष्यात अली असल्याचा शिजानचा दावा; धोकादायक औषधे घेत असल्याचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 06:52 IST

जामिनावर उद्या सुनावणी

नालासोपारा : शिजानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनीषा शर्माच्या आयुष्यात अली नावाची व्यक्ती आली होती. मृत्यूच्या १५ मिनिटे आधी तुनीषा अलीशी व्हिडीओ कॉलवर १५ मिनिटे बोलली होती. त्यामुळे शिजान नव्हे, तर अली हा तिच्या संपर्कात असल्याचा दावा अभिनेता शिजान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी सोमवारी वसई न्यायालयात केला. शिजानच्या जामिनावरील सुनावणीदरम्यान त्यांनी हा युक्तिवाद केला. यावरील बाजू मांडण्याचे काम अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी ११ जानेवारीला होईल. 

तुनीषा काही औषधे घेत होती. ती औषधे धोकादायक होती, असा दावाही त्यांनी न्यायालयात केला. तुनीषा- शिजानने ब्रेकअप झाल्यानंतरही त्यांच्यात मैत्रीचे संबध होते. ती टिंडर या डेटिंग ॲपवर सक्रिय होती. तेथे तिची अलीसोबत मैत्री झाली व ते तिच्या आईला माहीत होते. तुनीषा अलीसोबत डेटवरही गेली होती. २१ ते २३ डिसेंबरदरम्यान तुनीषा अलीशी बोलली. २३ डिसेंबरला तिने अलीच्या फोनवरून आईला व्हिडीओ कॉलही केला होता, असा दावा मिश्रा यांनी शिजानच्या वतीने केला. शिजान १० दिवसांपासून ठाण्याच्या मध्यवर्ती तुरुंगात आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याने जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर युक्तिवाद सुरू आहे. 

तुनीषाला शिजान उर्दू शिकवत असल्याच्या तिच्या आईच्या दाव्यात तथ्य नाही. शिजानला, त्याचा बहिणींना उर्दू येत नाही. शिजान जे उर्दू बोलतो, ते डायलॉग त्याच्या स्क्रिप्टमध्ये असतात. शिवाय तुनीषाला हिजाबची सक्ती केल्याचा आरोपही वस्तुस्थितीला धरून नाही. तिचे हिजाबचे फोटो हे मालिकेच्या शूटदरम्यानचे आहेत, असेही त्याचा वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तुनीषाने तिचा सहकलाकार आणि मित्र पार्थला तिच्या समस्या सांगितल्या होत्या. जेव्हा शिजानला याची माहिती मिळाली, तेव्हा त्याने तुनीषाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यांना याची माहिती दिली.

मुस्लीम असल्यामुळेच अटक केल्याचा दावा 

शिजान मुस्लिम असल्यामुळेच त्याच्यावर लव्ह जिहादचे आरोप झाले. त्याला अटक करण्यात आली. तो मुस्लिम नसता तर अटक झाली नसती, असा दावाही त्याच्या वकिलांनी केला. त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत, तरीही लव्ह जिहादसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची दोन दिवस चौकशी करण्यात आली, असे म्हणणे मिश्रा यांनी मांडले. 

तुनीषा दुसऱ्याशी बोलते शिजानला कसे कळले?

शिजानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांच्या युक्तिवादानंतर तुनीषाचे वकील तरुण शर्मा यांनी बचाव पक्षाकडून काही कागदपत्रे सादर केली आहेत. याचे उत्तर देण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे म्हणणे मांडले. त्यांनी न्यायालयाकडे ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली. आत्महत्येपूर्वी शिजान तुनीषाशी बोलला नाही, तर ती दुसऱ्याशी बोलत आहे, हे त्याला कसे कळले, असा सवाल त्यांनी केला. तुनीषाच्या आयफोनवरून पोलिसांना अद्याप ती कोणाशी बोलली, याचा शोध लावता आलेला नाही, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

टॅग्स :Tunisha Sharmaतुनिशा शर्माDeathमृत्यूCourtन्यायालयPoliceपोलिस