शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सायनमध्ये दोन हजार नव्या मतदारांची नोंद

By admin | Updated: October 7, 2014 02:25 IST

नव्या मतदारांची पडलेली भर यामुळे सायन-कोळीवाडा मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या २ लाख ५४ हजार १६३ पर्यंत पोहोचली आहे

मुंबई : नव्या मतदारांची पडलेली भर यामुळे सायन-कोळीवाडा मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या २ लाख ५४ हजार १६३ पर्यंत पोहोचली आहे. या वाढलेल्या मतदारांचा फायदा उमेदवार घेण्याच्या तयारीत असून त्याचा फायदा नक्की कोणाला मिळणार हे पाहण्यासारखे असेल. आता २ हजार ८२0 नवीन मतदारांची नोंद झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांचा कस लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना, भाजपा महायुती तुटल्याने या पक्षांकडून स्वतंत्र उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मनसेसह अन्य राजकीय पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले असून या निवडणुकीत सगळ्यांचाच कस लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराकडून आपला मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. सायन-कोळीवाडा मतदारसंघातही तीच परिस्थिती आहे. आता या मतदारसंघात आणखी नव्या मतदारांची भर पडली असून ती मते मिळणार कुणाला याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सायन-कोळीवाडा मतदारसंघात ३0 जूनपर्यंत २ लाख ५१ हजार ३४३ मतदारांची नोंद झाली होती. मात्र १६ सप्टेंबरपर्यंत मतदार यादीतील नोंदणीचा अखेरचा दिवस असल्याने या दिवसापर्यंत नव्या मतदारांनी नोंदणी केली. यामुळे मतदार यादीत आणखी नवीन २ हजार ८२0 मतदारांची नोंद झाल्याचे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एम. एल. संख्ये यांनी सांगितले. एकूण मतदारांची संख्या २ लाख ५४ हजार १६३ पर्यंत पोहोचली आहे. यात पुरुष मतदारांची संख्या १ हजार ५३७ आणि महिला मतदारांची संख्या १ हजार २८३ ने वाढली आहे. (प्रतिनिधी)