शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कळव्याच्या सी लिंकला मान्यता

By admin | Updated: July 7, 2015 22:32 IST

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या सागरी सेतूला (सी लिंकला) अखेर राज्य शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे

ठाणे : मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या सागरी सेतूला (सी लिंकला) अखेर राज्य शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे या खाडीवर तिसरा आणि अतिशय महत्त्वांकाक्षी प्रकल्प येत्या काळात मार्गी लागणार आहे. या सेतूसाठी १८३ कोटींचा खर्च अपेक्षित धरला असून त्याचे डिझाईनदेखील अंतिम झाले आहे. येत्या दोन महिन्यात त्याचे काम प्रत्यक्षात सुरु होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे. ठाण्याकडून बेलापूर आणि खारेगावकडे जाणारी वाहतूककोंडी या सेतूमुळे फुटणार असून एकेरी वाहतूक या पुलावरुन केली जाणार आहे. तर ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी जुन्या पुलावरुन एकेरी वाहतूक होणार असून ब्रिटीशकालीन पूल हा पादचाऱ्यांसाठीच राखीव ठेवला जाणार आहे. विशेष म्हणजे नव्या सेतूवर सुद्धा पादचाऱ्यांसाठी मार्गिका उभारण्यात येणार आहे.विटावा पुलाखालील आणि खारेगावकडे जाणारी वाहतूककोंडी सुटावी यासाठी या सेतूचा प्रस्ताव पालिकेने २०११ मध्ये पुढे आणला. सध्या कळवा खाडीवर एक ब्रिटीशकालीन आणि एक पालिकेने बांधलेला पूल आहे. परंतु, ब्रिटीशकालीन पुलाची अवस्था दयनीय झाल्याने सध्या तो केवळ पादचाऱ्यांसाठी आणि दुचाकीसाठीच खुला ठेवला आहे. त्यामुळे नव्या पुलावर वाहतूककोंडी होतांना दिसते. त्यामुळेच पालिकेने या नव्या सागरी सेतूची संकल्पना पुढे आणली. त्यानुसार २०११ च्या अंदाजपत्रकात १० कोटींची तरतूद केली होती. तसेच २०१२ मध्ये महासभेनेदेखील त्याला मंजूरी दिली. सुरुवातीला सादर केलेल्या प्रस्तावात काहीसे बदल तत्कालीन आयुक्तांनी सुचविल्यानंतर पुन्हा या प्रकल्पावर काम सुरु झाले. परंतु, मेरीटाईम बोर्ड आणि इतर परवानग्या घेण्यात काहीसा विलंब झाल्याने या प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले होते. दरम्यान आता मागील आठवड्यात राज्य शासनाकडे झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने आता येत्या दोन महिन्यात त्याला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर म्हणजे हायटाईडपेक्षा सुमारे १२ मीटर उंचीवर हा सागरी सेतू उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच बेलापूर दिशेला अशा दोन्ही मार्गाने तो खाली उतरणार आहे. शिवाय साकेतकडून येणारी वाहतूक ही रोटरी पद्धतीनेवर चढून या सेतूवर जाणार आहे.