शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत पावसाचे धूमशान; मानवी साखळीच्या साहाय्याने केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:56 IST

रविवारी पहाटे पाचपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसाने वीकेंडला आराम करणाऱ्या नागरिकांची झोपच उडवली.

बोर्डी : रविवारी पहाटे पाचपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसाने वीकेंडला आराम करणाऱ्या नागरिकांची झोपच उडवली. पाण्याची तीव्रता अधिक असल्याने शहरासह ग्रामीण क्षेत्रातील सखल भागात पाणी साचले, तर नदी-नाले, ओहळ दुथडी भरून वाहू लागल्याने विविध मार्ग पाण्याखाली गेले. पाऊस थांबल्याने दुपारनंतर स्थिती पूर्वपदावर आली. दरम्यान, दिवसभर विजेचा खेळखंडोबा सुरु होता. डहाणू रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेचा मुख्य रस्ता ते तारपा चौक येथे पाणी साचले. येथून नागरिकांना सुरिक्षत मार्ग काढता यावा म्हणून काही समाजसेवकांनी मानवी साखळी आणि दोरखंडाच्या सहाय्याने मदतीचा हात पुढे केला. हा रस्ता काही काळ वाहतुकीस बंद झाला. पाण्याची तीव्रता वाढल्याने अनेकांनी परगावी जाण्याचा बेत रद्द केला. नारायण बाग, इराणी रोड, कोसबाड मार्गा लगतचा रेल्वेचा कंक्राडी पूल, मुकबधीर शाळा परिसर, कैनाड नाका, सावटा येथील ब्रिज, क्रि डो वर्ल्ड स्कुलकडे जाणारा रस्ता, जकात नाका अशा अनेक भागात पाणी साचले होते. दरम्यान डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांचा शहरात पाणी न तुंबण्याचा दावा फोल ठरल्याने नेटकऱ्यांनी तोंडसुख घेत खिल्ली उडवली.ग्रामीण भागातही पावसाचा जोर अधिक होता. घोलवड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर गुडघाभर पाण्यात होता. महेश मोठे यांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले. त्यामुळे महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली. तर घोलवड ग्रामपंचायतीने राबविलेल्या अनियोजित गटाराच्या विकास कामांमुळे ही आपत्ती ओढवली असून त्याला तालुका प्रशासन जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी मोठे कुटुंबियांनी केली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी ‘आपले सरकार’ या आॅनलाईन अ‍ॅपद्वारे केली आहे.
>मुसळधार पावसाने घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले. त्याला ग्रामपंचायत जबाबदार असल्याची तक्र ार आपले सरकार या अ‍ॅपवर केली असून कारवाई आवश्यक आहे.
- महेश मोठे, घोलवड ग्रामस्थ