शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

केलेला खर्च वाया गेल्याने  प्रस्थापितांसह इच्छुकांना धक्का 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:43 IST

वसई पालिका निवडणूक लांबणीवर :  कोरोना रुग्णवाढीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने वसई-विरार शहर महानगरपालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक पुन्हा काही कालावधीकरिता लांबणीवर पडली आहे. यामुळे निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रस्थापितांसह इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक इच्छुक उमेदवारांनी आचारसंहिता लागण्याआधीच बराच खर्च केला होता. मात्र, निवडणुका लांबणीवर पडल्याने केलेला खर्च वाया जाण्याबरोबरच मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा निधी कोठून आणायचा, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

वसई-विरार महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल किंवा मे २०२० मध्ये होणार होती. आधीच कोरोना महामारीमुळे निवडणुका तब्बल वर्षभर लांबणीवर पडल्या आहेत. या काळात कोरोना महामारीचा उद्रेक झालेला असतानाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापितांनी तसेच निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छुकांनी जीवाचे रान करून स्थानिक रहिवाशांच्या पर्यायाने मतदारांच्या गळ्यातील ताईत बनण्याचा प्रयत्नही केला होता. मास्क वाटप, सॅनिटायझर्सचे वाटप, आर्सेनिक या रोगप्रतिकारक गोळ्यांचे वितरण, धान्याचे वाटप, कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात प्रवेश मिळवून देणे, आयसीयूमध्ये प्रवेश मिळवून देणे, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे, अगदी कोरोनाने मृत्यू झाल्यास रुग्णवाहिका ते स्मशानभूमीपर्यंतची तजवीज करणे, कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या घरी जाऊन सांत्वन करणे, कोरोना रुग्णांच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात सतत जंतुनाशक फवारणी, स्वस्त दरात भाज्यांची, फळाची, धान्याची विक्री यासह शेकडो उपक्रम प्रभागा-प्रभागातील कानाकोपऱ्यात, चौकाचौकात सातत्याने राबविण्यात आले. हे समाजकार्य करताना अनेकांना कोरोनाचीही लागण झाली होती. 

...आणि पुन्हा ‘कोरोनाचे मांजर’ आले आडवे !कोरोनातून बरे होताच निवडणूक लढवू पाहणारे काही जण पुन्हा जनसेवेत व्यस्त झाल्याचे पाहावयास मिळाले. त्याच वेळी निवडणुकीच्या मतदार याद्यांचा कार्यक्रमही जाहीर झाला. प्रस्थापितांसह इच्छुकांनी हरकती घेण्याचा जोरदार कार्यक्रम पार पाडला. मातब्बरांनी दुसऱ्यांच्या प्रभागात अतिक्रमण करून निवडणूक लढविण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या असतानाच पुन्हा एकवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रस्थापितांसह इच्छुकांच्या वाटचालीत पुन्हा कोरोना महामारीचे मांजर आडवे आले आहे.