शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पदव्यांच्या आधारे पदोन्नती

By admin | Updated: April 6, 2016 01:54 IST

पदोन्नतीसाठी बीएडची पदवी बंधनकारक असताना पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल १३४ शिक्षकांनी बीपीएड या शारिरिक शिक्षणाच्या सुट्टीकालीन

शशी करपे, वसईपदोन्नतीसाठी बीएडची पदवी बंधनकारक असताना पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल १३४ शिक्षकांनी बीपीएड या शारिरिक शिक्षणाच्या सुट्टीकालीन अर्धवेळ अभ्यासक्रमाच्या पदव्या मिळवून त्या आधारे पदोन्नती मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी आता वसईतील जिल्हा परिषदेच्या १३४ शिक्षकांच्या पदव्यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी वसई पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. वसई तालुक्यात जिल्हा परिषद शाळेचे ८८४ शिक्षक असून त्यांच्याकडे डीएड पदव्या आहेत. पदोन्नतीसाठी बीएड पदवी बंधनकारक करण्यात आलेली आहे. १९९५ पासून सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत बीएड पास उमेदवारांनाच केंद्र प्रमुखपद दिले जात आहे. तसेच पाचवी ते सातवी पर्यंतसाठी बीएड पदवीधारकांची शिक्षक म्हणून नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत आता बीएड धारकांनाच नोकरी मिळू लागली आहे. मात्र, जुन्या शिक्षकांनी पदोन्नती साठी बीएड करण्याऐवजी बीपीएड ही पदवी मिळवल्याचे उजेडात आले आहे. वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १३४ शिक्षकांना गेल्या दोन तीन वर्षांपासून पदोन्नती देण्यात आली असून त्यांच्या वेतनश्रेणीतही वाढ झाली आहे. मात्र, पदोन्नतीसाठी ज्या पदव्या मिळवण्यात आल्या आहेत त्या पदव्यांना मान्यता नसल्याची तक्रार वसई भाजपा अध्यक्ष मारुती घुटुकडे यांनी केल्यानंतर बोगस पदव्यांचा घोटाळा उजेडात आला आहे.