शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांची दमछाक

By admin | Updated: October 11, 2016 02:35 IST

महाराष्ट्र गुजरात तसेच दिव-दमणच्या सीमेवर सूरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू पोलीस ठाण्यात एक दोन नव्हे तर

शौकत शेख / डहाणूमहाराष्ट्र गुजरात तसेच दिव-दमणच्या सीमेवर सूरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू पोलीस ठाण्यात एक दोन नव्हे तर तब्बल शंभर पोलीसांची कमतरता असल्याने डहाणू शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून दिवसा ढवळया घरफोडी, तसेच दुकानदारांना भर रस्त्यात लुटण्यांच घटना वाढत आहेत. शिवाय अपूऱ्या मनुष्यबळामुळे रोजच्या रोज होणारे मोर्चे, आंदोलने, पेट्रोलिंग, नाकाबंदी तसेच राकीय घडमोडी इत्यादी साठी प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना तारेवरची कसतर करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी लागत आहे.डहाणू-चर्चगेट लोकल सेवा सुरू झाल्याने झपाटयाने लोकसंख्या वाढत असलेल्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण ही वेगाने वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात पोलीस बळ कमी पडत आहे. मुंबईपासून केवळ १२० कि.मी. अंतरावर असलेले उहाणू पोलीस ठाण्याच्या १२३ चौ. कि.मी. अंतर्गत येत असलेल्या २८ गावे व शंभर पाड्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी डहाणू पोलीस ठाण्यात अधिक पदे र्मिाण करणे गरजेचे असतांना सध्या असलेली पदे ही रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई, महिला पोलीस, या पदांचा समावेश आहे. डहाणू पोलीस ठाण्यात सन २०१० नुसार १५५ मनुष्यबळाची गरज आहे. परंतु सध्या या पोलीस ठाण्यात केवळ ५५ अधिकारी, कर्मचारी वर्ग असल्याने दिवसेंदिवस वाढणाऱ्या घरफोडी, बलात्कार, विनयभंग, हाणामारी इ. कडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे येथे अपूऱ्या मनुष्यबळामुळे येथील उपलब्ध पोलीसांना चोवीस तास डयूटी करूनही इमरजेन्सीमध्ये बोलावून घेतले जात असल्याने पोलीस ताण तणावाखली असल्याचे दिसून येते.दरम्यान, नुकतेच डहाणूच्या रामवाडी भागात काही अज्ञात चोरटयांनी दिवसा ढवळया दोन घरफोड्या करून त्यातील सुमारे दोन लाखाचे दागिने चोरून पलायन केले. तर डहाणूच्या इराणी रोड येथे सध्याकाळच्या सूमारस दुकानबंद करून मोटारसायकल वरून जात असतांना काही अज्ञात चोरटयांनी दुकानदाराच्या हातातून तीन लाख रूपये असलेली बॅग हिसकावून पळ काढल्याने येथील व्यापरीवर्गात खळबळ उडाली आहे. तर अनेक दिवस झाले तरी पोलीसांना गुन्हेगार सापडत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.