शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनोर पोलीस ठाण्याला प्लॅस्टिकचा आधार

By admin | Updated: July 13, 2015 03:11 IST

मनोर पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात कागदपत्रे भिजू नये व पोलिसांना काम करण्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून इमारतीच्या

मनोर : मनोर पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात कागदपत्रे भिजू नये व पोलिसांना काम करण्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून इमारतीच्या छतावर हजारो रुपयांचे प्लॅस्टिक टाकावे लागते. मात्र, अशा पोलीस ठाण्याच्या इमारतीकडे आजपर्यंत वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आले आहे.७५ गावांतील नागरिकांचे संरक्षण व्हावे, गावपाड्यांत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये, या उद्दिष्टाने गृह विभागाने मनोर पोलीस ठाण्याची स्थापना एका भाडोत्री घरामध्ये केली. मात्र, पावसाळा आला की, पोलिसांची मोठी धावपळ होते. छत नादुरुस्त असल्यामुळे पावसाचे पाणी आतमध्ये पडते. ठाण्यामध्ये असलेली कागदपत्रे भिजू नये म्हणून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पूर्ण छतावर प्लॅस्टिक टाकून आपले काम मनोर पोलीस करीत असतात. नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांना पावसाळ्यात आपले संरक्षण करावे लागते, अशी मनोर पोलीस ठाण्याची अवस्था आहे.ठाणे जिल्ह्यातील अनेक पोलीस अधीक्षकांनी मनोर पोलीस ठाण्याला भेटी दिल्या,पोलीस ठाण्याची स्वतंत्र इमारत व्हावी, यासाठी नेहमी मागणी केली. परंतु, त्यांच्याकडून आजपर्यंत आश्वासनेच मिळाली. आता नवीन पोलीस अधीक्षक शारदा राऊत मनोर पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र इमारतीसाठी काय पाऊल उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.